शिवसेना अन् राष्ट्रवादी कुणी अन् का फोडली; संजय राऊतांचा थेट वार, नक्की काय म्हणाले?

Sanjay Raut : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच लागतील असं चित्र आहे. (Raut) त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागलेत असं दिसतय. या निवडणुकीसाठी अजून साटंलोटं ठरलेले नाही. या निवडणुका स्वतंत्र लढणार की आहे त्या आघाड्या, युतीचा धर्म पाळणार हे स्पष्ट नाही. त्यातच शिवसेना उद्धव ठाकरे गट स्वतंत्र लढतोय की मनसे सोबत येतोय याचीही सध्यातरी फक्त चर्चाच आहे. दरम्यान, खासदार संजय राऊतांनी मोठं विधान केलय. ते पुण्यात बोलत होते.
फडकला तर कसे होईल?
मुंबईत मराठी माणसाचा आवाज टिकवायचा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नसल्याचं ठासून सांगितलं. इथं कष्टकऱ्यांची ताकद फार मोठी आहे, मुंबईत जाऊन पहा या भागातला माणूस कष्ट करत आहे. मार्केटला जा सकाळपासून तुम्हाला याच भागातला माणूस कष्ट करताना दिसेल संघर्ष करताना दिसेल, असं ते म्हणाले. मुंबईमध्ये मराठी माणसाचा अस्तित्व असेल तर जुन्नर, मंचर फुलाच्या मार्केटमध्ये मराठी आवाज ऐकायला येतोय असंही ते म्हणाले.
आम्ही नातं जोडायला सकारात्मक, उद्धव ठाकरेंची.. शिवसेना-मनसे युतीसाठी संजय राऊतांचे संकेत
भायखळाच्या बाजारात मराठी माणूस, नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मराठी माणूस आहे. मुंबई मध्ये मराठी पण टिकवण्याचा काम या भागातील लोकांनी केलेले आहे. मुंबई आपल्या हातात ठेवण्याचे आणि शिवसेनेचा झेंडा मुंबईत नाही फडकला तर कसे होईल? असा सवाल त्यांनी केला. पक्ष आपला उभा राहिला पाहिजे विखुरलेली माणसे गोळा करण्याचा काम करा, असं आव्हान त्यांनी यावेळी केले.
स्वाभिमानाचा विषय जनतेत
हा मराठी माणूस त्याच्या अंगावर जाईल म्हणून त्याने शिवसेना फोडली. म्हणून त्याने शरद पवारांच्या पक्ष फोडला आहे. हे दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणारे पक्ष होते. हे आपण लोकांपर्यंत हा विचार विषय नेला पाहिजे. शिवसेनेचा तिथे मराठी माणूस आहे मत देतो. आपल्याला मराठी माणूस अजूनही मराठी माणसाच्या मनामध्ये आपल्याविषयी किलमिश नाही. तो आपल्याला बाळासाहेब ठाकरेंनाच मत देणार तो त्याचे उपकार विसर नाही, असे राऊत म्हणाले.