मुलगी बनली नागीण ? गाव हादरलं; पण पोलिसात तपासात वेगळचं गूढ आढळलं

UP woman flees: कारण बेडवर पाच फूट सापाची कातीण होती. मुलीच्या बांगड्या व इतर वस्तू तिथेच पडलेल्या होत्या. मुलगी नागिण झाली असे गावभर पसरले.

UP woman flees home after leaving snake skin On bed

UP woman flees home after leaving snake skin On bed

रात्रीच्या वेळी मुलगी घरातील बेडवर झोपलेली होती. सकाळी मुलगी झोपेतून उठली नाही म्हणून घरातील लोक तिला पाहण्यासाठी गेले होते. परंतु बेडवरील काही वस्तू पाहून मुलीच्या घरच्यांची पाया घालची जमीन सरकली. कारण बेडवर पाच फूट सापाची कातीण होती. मुलीच्या बांगड्या व इतर वस्तू तिथेच पडलेल्या होत्या. मुलगी नागिण झाली असे गावभर पसरले. त्यामुळे गाव दहशतीत होते. परंतु पोलिस आल्यानंतर पुढे चौकशीत वेगळंच गूढ उघडकीस आलं. मुलगी एका तरुणाबरोबर पसार झाली आहे. त्यासाठी तिनेहा हा बनाव रचल्याचे समोर आलीय. ही घटना उत्तर प्रदेशमधील औरैया जिल्ह्यातील एका गावात घडलीय. (UP woman flees home after leaving snake skin On bed )

चोवीस वर्षीय रिना ही रविवारी रात्री घरात झोपलेली होती. सोमवारी सकाळी ती घरात आढळून आली नाही. तिच्या बेडवर पाच फूट उंच सापाची कातीण आढळून आलीय. तसेच बांगड्या, अंगठ्या, कपडे बेडवरच आढळून आले. त्यामुळे मुलगी नागिण झाल्याचा दावा गावात सुरू करण्यात आला. त्यामुळे गावभर याची चर्चा झाली. मुलीच्या घरी ग्रामस्थांची गर्दी झाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिस ही घटनास्थळी आले. त्यांनी चौकशी सुरू केले. त्यावेळी पोलिस तपासात वेगळीच माहिती समोर आली.


रिनाचे गावातील तरुणाशी प्रेमसंबंध

रिनाचे त्याच गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होतो. ते ही काही दिवसांपूर्वीच गावातून निघून गेलेला होता. तिच्या कुटुंबाने तिचे लग्न दुसऱ्या तरुणाशी निश्चित केले होते. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी तिने पळून जाण्यापूर्वी हे घडवून आणल्याचे पोलिस तपासात समोर आलंय. ती आईच्या फोनवरून एका तरुणाच्या संपर्कात होते. त्या आधारे पोलिस तिचा शोध घेत आहेत. आता रिनाच्या वडिलांच्या तक्रारीवर एका मुलाविरुद्ध गुन्हे नोंदविला आहे. तर पोलिस स्टेशनचे अधिकारी मनोज गंगवार यांनी मुलगी नागीण झाल्याची अफवा फेटाळून लावलीय. आता पळून गेलेल्या मुलीचा व तिच्या प्रियकराचा शोध घेण्यासाठी तीन पथके पाठविण्यात आलेत.

Exit mobile version