UPI Circle new feature BHIM UPI App: आता UPI पेमेंट करण्यासाठी तुम्हाला बँक खात्याची गरज भासणार नाही. तसेच तुम्ही इतरांच्या बँक खात्यातूनही UPI पेमेंट करू शकणार आहात. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने अलीकडे डेलीगेट पेमेंट सिस्टम UPI सर्कल हे नवे फीचर लाँच केले आहे. सध्या हे फीचर BHIM UPI ॲपवर लाइव्ह झाले आहे. नवीन फीचर काय आहे. ते कुणाच्या फायद्याचे ठरेल. पेमेंट करण्याची किती मर्यादा आहे हे आपण विषय सोपामधून जाणून घेऊया…
काय आहे यूपीआय सर्कल?
यूपीआय सर्कल (UPI Circle) ही एक डेलिगेटेड पेमेंट सेवा आहेत. त्यात यूपीआय वापरकर्ता आपल्या कुटुंबातील सदस्यांना, नातेवाईक किंवा मित्रांना जोडू शकतो. ज्याच्याकडे आपले बँक अकाउंट नाही त्याच्यासाठी हे फिचर आहे. विशेष करून घरातील वृद्ध व्यक्ती विद्यार्थी यांच्यासाठी हे फीचर उपयोगी ठरणार आहे. ते UPI Circle ला जोडल्यानंतर यूपीआय पेमेंट करू शकतील.
प्राथमिक वापरकर्ता पाच दुय्यम वापरकर्त्यांना त्यांचे खाते वापरून व्यवहार करण्याची परवानगी देऊ शकतो. UPI सर्कलमध्ये वापरकर्ते दोन प्रकारचे असतील. एक पूर्ण आणि एक आंशिक वापर करता. प्राथमिक वापरकर्ता यूझर 15 हजार रुपयांपर्यंत महिन्याची मर्यादा ठेवू शकतो. एका वेळी पाच हजार रुपयांची पेमेंट मर्यादा आहे. याचा अर्थ सर्कलला जोडलेली व्यक्ती पंधरा हजार रुपये पेमेंट करू शकते. त्यासाठी मूळ यूपीआय अकाउंट असलेला म्हणजे प्रायमरी यूजरची परवानगीची आवश्यकता नाही. तर प्रायमरी युझर हा एका दिवसासाठी एक लाखाची व्यवहाराची मर्यादा ठेवू शकेल.
तर प्रायमरी यूर्झरची परवानगी आवश्यक
आंशिक (Partial) वापरकर्तामध्ये UPI सर्कलला जोडलेल्या सर्व व्यक्तींना व्यवहार करण्यासाठी प्रायमरी यूझर्सची परवानगीची आवश्यकता आहे. त्यानंतर दुय्यम वापरकर्ता यूपीआय पेमेंट करेल. त्यानंतर प्रायमरी वापरकर्त्याला पेमेंट झाल्याचे नोटिफिकेशन येईल. त्यानंतर मूळ वापरकर्ता यूपीआय पिन क्रमांक टाकून परवानगी देईल. जो यूपीआय सर्कल तयार करेल, तो प्राथमिक वापरकर्ता म्हणजे प्रायमरी यूझर करेल. तर जोडलेल्या व्यक्ती या सेकेंडरी यूझर्स असेल. यूपीआय वापरकर्ता एकाच यूपीआय सर्कलमध्ये राहू शकते.
यूपीआय सर्कल कसे वापराल ?
यूपीआय सर्कल हे फीचर वापरण्यासाठी प्राथमिक आणि दुय्यम वापरकर्त्याकडे BHIM UPI अॅप असण्याची आवश्यकता आहे. दोघांकडेही यूपीआय अकाउंट आवश्यक आहे. तर प्राथमिक वापरकर्त्याकडे बँक अकाउंट आवश्यक आहे. इतर दुय्यम वापरकर्त्यांकडे बँक अकाउंटची आवश्यकता नाही. प्राथमिक वापरकर्त्याला BHIM UPI अॅप लॉंच करावे लागेल. त्यानंतर होम पेजवर UPI Circle का फीचर दिसले. त्यानंतर सर्कल तयार करण्यासाठी क्रिएटेड ऑप्शनला जावे. त्यानंतर तुम्हाला कुणी जोडणार असेल तर रिसिव्ह ऑप्शनमध्ये जावे. जो व्यक्ती UPI Circle क्रिएट करेल तो प्राथमिक वापरकर्ता (प्राइमरी यूझर) मानला जाईल. त्यानंतर पुढच्या पेजवर अॅड फॅमिली आणि फ्रेंडस हा पर्याय आहे. त्यांना आपण क्यू आर कोड स्कॅन करून किंवा मॅन्युअली यूपीआय आईडी टाकून यूपीआय सर्कलला जोडले जाईल. त्या प्राथमिक वापरकर्ता हा पेमेंटचा मर्यादा सेट करेल.
कुणाला फायद्याचे ?
कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे सर्कल उपयोगी ठरेल. त्यात विद्यार्थी शैक्षणिक खर्च, प्रवास खर्च, खाद्य पदार्थासाठी वापरू शकतो. वयोवृध्द व्यक्ती हा कौटुंबातील सदस्यांच्या मदतीने आपले पेमेंट करू शकतो.