आता डेबिट कार्डशिवाय ATM मधून काढा पैसे; भारतात UPI कॅश विड्रॉल सिस्टिमची सुरुवात

आता डेबिट कार्डशिवाय ATM मधून काढा पैसे; भारतात UPI कॅश विड्रॉल सिस्टिमची सुरुवात

Bank of Baroda facility : बँक ऑफ बडोदा ही UPI द्वारे रोख पैसे काढण्याची सेवा देणारी सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक ठरली आहे. बँकेच्या ICCW म्हणजेच इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉवल सेवेद्वारे दिवसातून फक्त 2 वेळा पैसे काढता येतात. बँकेने व्यवहाराची मर्यादा 5,000 रुपये ठेवली आहे. म्हणजेच, ग्राहक एका दिवसात जास्तीत जास्त 10,000 रुपये काढू शकतो. (Bank of Baroda launched facility to withdraw money from ATMs without debit card)

जे ग्राहक BHIM UPI, BOB World UPI आणि ICCW सुविधेसाठी सक्षम केलेले इतर कोणतेही UPI अॅप वापरत असतील तर डेबिट कार्ड न वापरता बँक ऑफ बडोदाच्या एटीएममधून पैसे काढू शकतात.

रोख रक्कम काढण्याचा सोपा, सोयीस्कर आणि सुरक्षित मार्ग
बँक ऑफ बडोदाचे मुख्य डिजिटल अधिकारी अखिल हांडा म्हणाले की, बँकेने सादर केलेली नवीन ICCW सुविधा ग्राहकांना प्रत्यक्ष कार्डचा वापर न करता पैसे काढण्याचे स्वातंत्र्य देते. रोख पैसे काढण्याचा हा एक सोपा, सोयीस्कर आणि सुरक्षित मार्ग आहे.

WTC Final : ‘कोण म्हणतं ऑफस्पिनर या खेळपट्टीवर खेळू शकत नाही?’, सौरव गांगुलीचा रोहित-द्रविडला सवाल

युपीआयच्या माध्यामातून पैसै काढण्याची प्रक्रिया
या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाला बँक ऑफ बडोदाच्या एटीएममध्ये यूपीआय कॅश विथड्रॉल चा पर्याच निवडावा लागेल. त्यानंतर काढायची रक्कम टाकल्यानंतर एटीएमच्या स्क्रीनवर एक क्यूआर कोड दिसेल. व्यवहार अधिकृत करण्यासाठी ICCE साठी अधिकृत UPI ऍप वापरुन हा कोड स्कॅन करवा लागेल.

Kajol : ‘आयुष्यातील कठीण टप्प्यातून जात आहे’ म्हणत काजोलनं उचललं मोठं पाऊल !

संपूर्ण भारतात 11,000 हून अधिक एटीएम
बँक ऑफ बडोदाचे संपूर्ण भारतात 11,000 पेक्षा जास्त एटीएम आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने क्लोनिंग, स्किमिंग आणि डिव्हाइस टॅम्परिंग यांसारख्या कार्ड फसवणूक टाळण्यासाठी बँकांना ATM द्वारे ICCW पर्याय उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube