Download App

Parliament Budget Session : अदानींवरुन लोकसभा-राज्यसभेत गदारोळ

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहात (Loksabha Rajyasabha)अदानी ग्रुपवरील(Adani Group) हिंडेनबर्गच्या अहवालावरुन (Hindenburg Research) गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी चौकशीची मागणी करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहात घोषणाबाजी केली. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

आज विरोधी पक्षांनी अदानी ग्रुपबद्दल हिंडेनबर्गच्या अहवालावरून संसद भवनाबाहेर निदर्शनं केली. अदानी ग्रुपविरोधात फसवणूक आणि साठेबाजीच्या आरोपांची संयुक्त संसदीय समिती (JPC) चौकशी करण्याची मागणी करत विरोधी पक्षांनी निषेध केलाय.

काँग्रेसनं आज सोमवारी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखा आणि लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) कार्यालयांबाहेर देशव्यापी निदर्शनं केली. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभरात ठिकठिकाणी निदर्शनं केली आहेत.

चेन्नई, तामिळनाडू येथील एलआयसी कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली आहेत. याशिवाय हैदराबाद येथील एसबीआय कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. त्याचबरोबर काँग्रेसनं मुंबईमधील एसबीआय कार्यालयाबाहेर अदानी प्रकरणावर निदर्शनं केली आहेत.

विरोधकांनी हिंडेनबर्गच्या अहवालावरुन अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभेत काहीही कामकाज झालं नाही. दरम्यान, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार विनय विश्वम यांनी राज्यसभेत नियम 267 अन्वये निलंबनाची सूचना दाखल केली. यामध्ये अदानी ग्रुपच्या कंपन्यांवरील संकटावर चर्चा करण्यात आलीय.

Tags

follow us