Download App

UPSC निकाल जाहीर! इशिता किशोर देशात पहिली; तिन्ही टॉपर मुलीच

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीचा 2022 मधील परीक्षेचा (UPSC exam result 2022) निकाल जाहीर असून यात इशिता किशोर देशात पहिली आली आहे.  पहिल्या नंबर प्रमाणेच दुसऱ्या, तिसऱ्या नंबरवरही मुलींनीच बाजी मारली आहे. गरिमा लोहिया द्वितीय, उमा हरिती तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. (UPSC exam result 2022 has been declared and Ishita Kishore has come first in the country)

दरम्यान, चौथ्या नंबरवरही मुलीनेच बाजी मारली असून स्मृति मिश्रा चौथ्या क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे. त्यामुळे सालाबादप्रमाणे यंदाही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालात मुलींचाच दबदबा दिसून येत आहे. आयएएस परीक्षेत बसलेले उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट www.upsc.gov.in वर अंतिम निकाल पाहू शकतात.

यंदा 2 हजार 529 उमेदवारांनी मुलाखत दिली होती. त्यानंतर आता 15 दिवसांनी उमेदवारांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2022 अंतर्गत, UPSC ने IAS, IPS सह सेवांमधील 1011 पदांची जाहिरात काढली होती.

UPSC टॉपर इशिता किशोर कोण आहे?

UPSC परीक्षेतील टॉपर इशिता किशोर ही मूळची दिल्लीची असून तिने श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्राची पदवी घेतली आहे. आहे. तिच्या महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये तिची गणना होते. इशिता किशोरने कष्ट आणि जिद्दीने केवळ तिच्या कुटुंबाचे नव्हे तर कॉलेजचे नाव मोठे केले आहे.

महाराष्ट्रातूनही मुलींची बाजी :

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालात महाराष्ट्रातील पहिल्या स्थानावरही मुलीनेच बाजी मारली आहे. ठाण्याची कश्मीरा संखे ही महाराष्ट्रातून पहिली तर देशान 25 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. कश्मीराचा हा तिसरा प्रयत्न होता. तिने याआधी दोन वेळा प्रयत्न केला होता परंतु यंदा तिच्या प्रयत्नांना यश मिळाले. कश्मीराचे बाबा एका खासगी कंपनीत कामाला असून तिची आई देखील नोकरी करते.

Tags

follow us