नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीचा 2022 मधील परीक्षेचा (UPSC exam result 2022) निकाल जाहीर असून यात इशिता किशोर (Ishita Kishor) देशात पहिली आली आहे. पहिल्या नंबर प्रमाणेच दुसऱ्या, तिसऱ्या नंबरवरही मुलींनीच बाजी मारली आहे. गरिमा लोहिया द्वितीय, उमा हरिती तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. (Ishita Kishore is the topper of the UPSC Civil Services Exam 2022)
दरम्यान, चौथ्या नंबरवरही मुलीनेच बाजी मारली असून स्मृति मिश्रा चौथ्या क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे. त्यामुळे सालाबादप्रमाणे यंदाही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालात मुलींचाच दबदबा दिसून येत आहे. यंदा 2 हजार 529 उमेदवारांनी मुलाखत दिली होती. त्यानंतर आता 15 दिवसांनी उमेदवारांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इशिता किशोर शालेय जीवनापासूनच ऑल राऊंड व्यक्ती होती. अभ्यास, खेळ आणि सांस्कृतिक गोष्टींमध्ये ती गोष्टी पुढे असायची. इशिताने 2014 मध्ये बाल भारतीमधून 12वी पूर्ण केली. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाचे प्रसिद्ध कॉलेज श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे. पदवीनंतर इशिताने 2 वर्षे अर्न्स्ट अँड यंगसोबत रिस्क अॅडव्हायझरी म्हणून काम केले आहे. (Know About UPSC Topper 2022 Ishita Kishor)
यूपीएससीच्या तयारीदरम्यान, तिने तिच्या एका मॉक इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, ती एक अॅक्टिव्ह प्लेअर आहे. शाळेतील दिवसांपासून ती चांगली अष्टपैलू कलाकार देखील आहे. पदवीनंतर किंवा कॉलेजच्या काळातही ती खेळात जास्त अॅक्टिव्ह असायची. याशिवाय शाळेत होणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये ती सक्रियपणे सहभागी होत असे, शाळेतील प्राध्यापकही वेळोवेळी प्रत्येक गोष्टीत सहभागी कसे व्हायचे याबद्दल तिला मार्गदर्शन करत असायचे.
#WATCH | Ishita Kishore, who has secured 1st rank in UPSC 2022 exam, says, "One has to be disciplined and sincere to be able to achieve this." pic.twitter.com/YKziDcuZJz
— ANI (@ANI) May 23, 2023
पण तिने अभ्यास करताना कोणतीही कसर सोडली नाही. शाळेपासून ते UPSC मध्ये उत्तीर्ण होईपर्यंतच्या प्रवासात तिने अभ्यासातील शिस्त कटाक्षाने जपली. तुम्ही कितीही हुशार असाल पण जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी तुमचे सर्वस्व देत नाही, मनापासून एखाद्या गोष्टीत स्वतःला झोकून देत नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही, असं इशिता किशोरने ANI सोबत बोलताना सांगितले.
जर तुम्ही शाळेप्रमाणे ऑलराउंडर आयएएस झालात तर कोणता बेंचमार्क सेट कराल? असा प्रश्न इशिता किशोरल विचारण्यात आला होता. यावर इशिता किशोरने उत्तर दिले की, जर ती आयएएस अधिकारी झाली तर तिला टीमसोबत काम करायला आवडेल. यासोबतच नेतृत्व कौशल्याचा वापर करून ती अधिक चांगल्या पद्धतीने काम करु शकेल. यासोबतच इशिता म्हणाली की, त्यावेळी एका टीमसाठी जे चांगले असेल, तेच काम मी एकत्रितपणे करेन.
इशिता किशोरचे वडील एअरफोर्समध्ये अधिकारी आहेत. इशिताने सांगितले की, मी माझ्या वडिलांना नेहमीच देशसेवेसाठी तत्पर पाहिले आहे. म्हणूनच माझ्या वडिलांना पाहून मला लहानपणीच विचार आला होता की, मी मोठी झाल्यावर देशहितासाठी असे काम करेन, ज्यामुले मला माझ्या वडिलांप्रमाणे देशाची सेवा करता येईल.
इशिताने सांगितले की, तिने यूपीएससीसाठी घरूनच अभ्यास केला. राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे तिचे वैकल्पिक विषय होते. तिचा हा तिसरा प्रयत्न होता, त्यामुळे यावेळी यश मिळेल असे वाटत होते का? यावर इशिता म्हणाली की, मुलाखतीदरम्यान सर्वांच्याच अपेक्षा असतात. मी खूप मेहनत केली होती, त्यामुळे मला खात्री होती की मी या वेळी नक्की उत्तीर्ण होईन.