Download App

UPSC टॉपर रिया दाबीशी विवाह, कोण आहेत IPS मनीष कुमार? महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन

UPSC Topper Ria Dabi : बहुचर्चित आयएएस अधिकारी टीना दाबी यांची लहान बहिण आणि राजस्थान कॅडरच्या आयएएस अधिकारी राजस्थान कॅडरच्या आयएएस अधिकारी रिया दाबी यांनी गुपचुप आपला विवाह उरकला खरा मात्र या विवाहाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. रिया दाबीने 2021 बॅचचे आयपीएस अधिकारी मनीष कुमार यांच्याशी लग्नगाठ बांधली. तर ते लवकरच जयपूरमध्ये रिसेप्शन देणार आहेत. तर रिया दाबी यांचे पती महाराष्ट्राशी खास कनेक्शन आहे. काय आहे हे कनेक्शन जाणून घेऊ… (UPSC Topper Ria Dabi Marri with IPS Manish Kumar Maharashtra Connection)

‘बावनकुळे म्हणजे कंस मामा, आता त्यांनी रावणाचं रुप घेतलं’; भाच्यानेच केली आगपाखड

बहुचर्चित आयएएस अधिकारी टीना दाबी यांच्या प्रमाणे त्यांची लहान बहिण असलेल्या रिया दाबी देखील सोशल मीडियावर कायम सक्रिया आणि चर्चेत असतात. त्या नेहमी सोशल मीडियावर आपले फोटो शेअर असतात. त्यांचे फॉलोअर्स देखील प्रचंड आहेत. तर मसुरी येथाल अॅकॅडमीमध्ये त्यांची आणि मनीष यांची पहिल्यांदा भेट झाली. तर हळूहळू त्यांच्यात प्रेमाचं नात निर्माण झालं. असं सांगण्यात येत आहे की, रियाने पहिल्याच भेटीत मनीष यांना आपल्या जीवनाचा साथीदार म्हणून निवडलं.

राहुल गांधींच्या अमेरिकेतील ट्रक प्रवासानंतर गडकरींची ट्रकचालकांसाठी मोठी घोषणा

मनीष कुमार यांचं महाराष्ट्राशी खास कनेक्शन…

रिया दाबी यांची पोस्टींग सध्या अलवार येथे आहे. तर पती मनीष कुमार यांचं महाराष्ट्राशी खास कनेक्शन आहे. त्यांनी 2020 ची सिव्हिल सेवेची परिक्षा पास केली आहे. ते दिल्लीचे रहिवासी असून त्यांचं पोस्टींग महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात होते. मात्र आता ते महाराष्ट्र कॅडरमधून राजस्थानात जाणार आहेत. या अगोदर देखील अनेक अधिकाऱ्यांनी कॅडर बदलेले आहेत.

16 जूनला त्यांना शासनाने हा बदलीचा आदेश जारी केला आहे. या बदली मागे त्यांच्या लग्नाचंच कारण सांगितलं जात आहे. कारण लग्नानंतर नवदाम्पत्य एकत्र राहू शकेल. तर त्यांच्या या लग्नाच्या राजस्थान प्रशासनात आणि सोशल मीडियावर चांगल्याचं चर्चा रंगल्या आहेत.

Tags

follow us