राहुल गांधींच्या अमेरिकेतील ट्रक प्रवासानंतर गडकरींची ट्रकचालकांसाठी मोठी घोषणा

राहुल गांधींच्या अमेरिकेतील ट्रक प्रवासानंतर गडकरींची ट्रकचालकांसाठी मोठी घोषणा

AC Compulsory in Truck Cabin : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारतातील ट्रकमध्ये बसून प्रवास केला. भारतातील ट्रकचालकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर अमेरिकेतील ट्रकमध्येही बसले. तेथील ट्रकचालकांची कमाई आणि त्यांना मिळणाऱ्या सोयसुविधा पाहून अवाक् झाले. भारतातील ट्रकचालकांना अशा काही सुविधा मिळत नाहीत अशी खंतही व्यक्त केली. त्यानंतर योगायोग पहा, केंद्र सरकारने ट्रकचालकांना दिसाला देणारा निर्णय घेतला आहे. आता ट्रक चालविताना ट्रकचे केबिन कायमच ठंडा ठंडा कूल कूल राहिल. कारण, ट्रक कंपन्यांना ट्रकच्या केबिनमध्ये एसी लावण्याची सक्ती केंद्र सरकारने केली आहे.

या निर्णयामुळे 11 ते 12 तास, ट्रक चालविणाऱ्या चालकांचा प्रवास आरामदायक होणार आहे. सध्या व्हॉल्वो आणि स्कॅनिया अशा विदेशातील दोन मोठ्या ट्रक कंपन्या ट्रकच्या केबिनमध्ये एसीची सुविधा देतात. मात्र, आता सरकारने हा निर्णय घेतल्याने अन्य ट्रक कंपन्यांनाही या आदेशाचे पालन करणे बंधनकारक होणार आहे.

Ganesh Sugar Factory Election; ‘ही सुरुवात आहे हे लक्षात ठेवा’, थोरातांचा विखेंवर हल्लाबोल

केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी काल दिली. ते म्हणाले, ट्रकच्या केबिनमध्ये एसी लावण्याबाबत आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. देशभरात ज्या ट्रक आहेत त्यामध्ये हा बदल करण्यासाठी किमान दीड वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे 2025 पर्यंत सर्व कंपन्यांनी आपल्या ट्रकमध्ये बदल करून घ्यावेत असे गडकरी म्हणाले.

तसे पाहिले तर देशभरात अनेक ठिकाणी दिवसाचे तापमान 40 अंशांच्या पुढे असते. अशा उष्ण वातावरणातही ट्रक चालक ट्रक चालवत असतात. या उष्णतेचा त्यांनाही त्रास जाणवतो. त्यामुळे त्यांचे हाल होतात. हा निर्णय घेतला तर ट्रकच्या किंमती वाढतील असे कारण देत काही जणांकडून यास विरोध होत होता. मात्र तरीदेखील सरकारने हा निर्णय घेतल्याचे गडकरी म्हणाले.

‘शिंदे गुवाहाटीत नव्हे अयोध्येत करणार होते बंड’; ठाकरे गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट

दरम्यान, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या काळात राहुल गांधी यांनी ट्रकमधून प्रवास केला होता. त्यांच्या या प्रवासाची चांगलीच चर्चा झाली होती. सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. या प्रवासादरम्यान त्यांनी ट्रकचालकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube