Download App

आदिवासी तरुण लघुशंका प्रकरण : मुख्यमंत्र्यांनी पाय धुतलेला ‘तो’ पीडित तरुण नाही? चर्चांना उधाण

आदिवासी तरुण लघुशंका प्रकरण मध्य प्रदेशात चांगलचं तापल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ज्या आदिवासी तरुणाचे पाय धुतले, औक्षण करीत त्याचा सन्मान केला होता, तो तरुण लघुशंका प्रकरणातील नसल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या प्रकरणावरुन विरोधकांकडून अनेक टीका-टिपण्या केल्या जात आहेत. मध्य प्रदेश काँग्रेसकडून ट्विट करीत ‘खरा पीडित बेपत्ता आहे का? शिवराजजी, इतका मोठा कट? जनता तुम्हाला माफ करणार नाही’ असं ट्विट करण्यात आलं आहे.

ज्या व्यक्तीचे मुख्यमंत्री चौहान यांनी पाय धुतले होते तो व्यक्ती आदिवासी तरुण लंघुशंका प्रकरणातील पीडित तरुण नसल्याचा दावा मध्य प्रदेश काँग्रेसकडून करण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पीडित दशमत रावत यांचे पाय धुतले आणि डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण आता हा पीडित नसून कोणीतरी वेगळाच माणूस असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. विरोधी पक्षांपासून सोशल मीडिया युजर्सपर्यंत सर्वजण हेच म्हणत आहेत की पीडित व्यक्तीच्या ऐवजी कोणा दुसऱ्याच व्यक्तीला मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी भोपाळला नेण्यात आलं.

Manmohan Mahimkar: ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची अंकिताकडे विनवणी, म्हणाले- ‘मुली, मला काम हवंय..’

दशमत रावत यांची बॉडी लॅंग्वेजवरुन हे दावे करण्यात येत आहेत. मध्यप्रदेश काँग्रेसने रविवारी एक ट्वीट केलं होतं. यामध्ये म्हटलं आहे की, सिधी लघुशंका प्रकरणामध्ये मोठा खुलासा, शिवराज यांनी कोणा दुसऱ्याच व्यक्तीचे पाय धुण्याचं नाटक केलं. खरा पीडित बेपत्ता आहे का? शिवराजजी, इतका मोठा कट? मध्यप्रदेश तुम्हाला माफ करणार नाही. असं ट्विट काँग्रेसकडून करण्यात आलं आहे.

अहमदनगर : जिल्हा सुखावला… भंडारदरा, मुळा, निळवंडे धरण क्षेत्रात चांगला पाऊस, पर्यटकांची वर्दळ वाढली

आरोपी प्रवेश शुक्ला याने ज्या आदिवासी मुलाच्या अंगावर लघुशंका केली होती तो व्यक्ती आणि दशमत रावत यांच्यात खूप फरक आहे. पीडित मुलाचं वय १६-१७ आहे ज्याचे पाय धुतले गेले, त्या रावत यांचं वय ३५-३८ च्या आसपास असल्याचं दिसून येत आहे. शिवाय व्हायरल व्हिडीओमध्ये मुलाचे केस काळे, दाट आणि कुरळे आहेत. या प्रकरणावरुन सध्या मध्य प्रदेशात एकच चर्चा रंगली असून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान इतका मोठा कट? खरा पीडित बेपत्ता आहे काय? असा सवाल ट्टिटरद्वारे करण्यात आला आहे.

Canada: भारतीय दूतावासासमोर जमले खलिस्तानी समर्थक, भारतीयांनी तिरंगा फडकावून दिले चोख प्रत्युत्तर

नेमकं काय घडलं होतं?
सिधी जिल्ह्यातील एक आदिवासी तरुण एका ठिकाणी बसलेला होता. या आदिवासी तरुणाच्या जवळ येत प्रविण शुक्ला मुजोराने मद्यधुंद अवस्थेत असताना त्याच्या अंगावर लघुशंका केली होती. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया देण्यात आल्या होत्या.

त्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आदिवासी तरुणाला भोपाळ इथल्या निवासस्थानी बोलवून घेत. त्याला मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसवून स्वत: त्याचे पाय धुतल्याचं समोर आलं होतं. यासंदर्भातील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. एवढंच नाहीतर मुख्यमंत्री चौहान यांनी आदिवासी तरुणाला टिळा लावत हार आणि शाल देऊन सन्मानही केला होता. तसेच श्रीगणेशाची प्रतिमाही भेट म्हणून दिली आहे.

दरम्यान, एकंदरी संपूर्ण घडामोडीनंतर आता मध्य प्रदेश कॉंग्रेसकडून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना आदिवासी पीडित मिळत नसल्यानेच त्यांनी दुसऱ्याच व्यक्तीचा सन्मान करुन कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावरुन आता मध्य प्रदेशातील वातावरण चांगलचं तापत असल्याचं दिसून येत आहे.

Tags

follow us