Road Accident : देशभरात रस्ते अपघातांच्या संख्येत वेगाने वाढ होत (Road Accident) चालली आहे. आताही अशाच एका भीषण अपघाताची बातमी उत्तर प्रदेशातून आली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर-आग्रा महामार्गावर एक भरधाव ट्रक चहाच्या दुकानात घुसला. या अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली. पोलिसांनी या चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेण्यात आले. तसेच अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Road Accident : लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाडावर काळाचा घाला! भीषण अपघातात 6 जण जागीच ठार
इटावा जिल्ह्याचे डीएम अवनीश राय हे देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सांगितले की एक डंपर ट्रक हॉटेलात घुसला. या घटनेत तिघा जणांचा मृत्यू झाला आणि तीन लोक गंभीर जखमी झाले. जखमींना पुढील उपचारसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा तपास करण्यात येणार आहे.
एएनआय वृत्तसंस्थेने एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये दिसत आहे की ट्रकचा बॅलन्स गेल्याने ट्रक सरळ हॉटेलात घुसला. यामुळे हॉटेलचे मोठे नुकसान झाले. यानंतर क्रेनच्या मदतीने ट्रकला बाहेर काढण्यात आले. यावेळी येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. मदतकार्य सुरू करण्यात आले. अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्रातील अपघातातही असेच घडले होते. गौरी गणपतीच्या सणासाठी कुटुंब पुण्याहून अमरावतीकडे निघाले होते. समृद्धी महामार्गावर असताना अचानक वन्यप्राणी आडवा आला. या प्राण्याचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात कार तीन वेळा पलटी झाली. कारची वेगात होती. त्यामुळे वेगातच पलटी झाली. या अपघातात कुटुंबातील महिला ठार झाली. तर अन्य तीन प्रवासी जखमी जखमी झाले. या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज आहे. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे.
Road Accident : कुटुंबावर काळाचा घाला! भीषण अपघातात तिघे ठार, 5 जण जखमी