Download App

Atiq Ahmed News : अतिक अहमदच्या मुलाने केला फायर, व्हिडिओ व्हायरल

उत्तर प्रदेशातील गुंड अतिक अहमदच्या मुलाचा गोळीबार करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये अतिक अहमदचा मुलगा अली अहमद रागाच्या भरात गोळीबार करत आहे. व्हिडिओमध्ये अतिकचा भाऊ, मुलासह गॅंगमधील अनेक लोकं गोळ्या झाडत आहेत. अडीच मिनिटांच्या व्हिडिओमध्ये तब्बल 150 पेक्षा अधिक गोळ्या झाडण्यात आल्या आहेत.

पियूष गोयल म्हणतात, देशातील महागाई आटोक्यात; जाहीर केली वस्तूंच्या दरांची यादी

मिळालेल्या माहितीनूसार हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील एका लग्नातला असल्याचं सांगितलं जात असून व्हिडिओ सात वर्ष जूना असल्याचंही समोर येत आहे. अतिक अहमदचा मेहुणा शाबी अहमदच्या लग्नात हा गोळीबार झाल्याचं समोर येतंय. अतिक अहमदच्या मेहुण्याचं लग्न 2016 साली झालं होतं. या लग्नात अतिक अहमदच्या मुलाने गोळीबार केल्याचं समोर येतंय.

आदित्य ठाकरे ठाण्यातला कोणता मतदारसंघ निवडणार?

सुरुवातीला अतिक अहमदचा मुलगा अली अहमद आणि अशरफने आपल्या मुलाला फोन केला. त्यानंतर तो गोळीबार करत आहे. 2016 साली अरिफ मुल्लांच्या कन्येसोबत शबी अहमदचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी अनेकजण उपस्थित होते. व्हिडिओत गोळीबार सुरु असताना अनेक लोकं उभे असल्याचं दिसून येत आहे. यावेळी अतिक अहमदचा भाऊ खालिद अझीम उर्फ ​​अश्रफ हा देखील खुर्चीवर बसून गोळीबार करताना दिसत आहे.

फडणविसांनी ठाकरेंवर भावासारखं प्रेम केलं : बावनकुळे असं का म्हणाले?

दरम्यान, अतिकचा मुलगा अली अहमद पूर्ण आत्मविश्वासाने, हसत फायर करतो. एकाच फटक्यात अनेक राऊंड फायर केल्यानंतर त्याच्या पाठीवर थाप मारून अभिनंदनही करत आहे. यानंतर अश्रफनेही अनेक राऊंड फायर केले आणि आपले पिस्तूल समोरच्या टेबलावर ठेवले. अतिक अहमदचा खास असद कालिया याने सर्वाधिक गोळीबार केला आहे.

Tags

follow us