पियूष गोयल म्हणतात, देशातील महागाई आटोक्यात; जाहीर केली वस्तूंच्या दरांची यादी

पियूष गोयल म्हणतात, देशातील महागाई आटोक्यात; जाहीर केली वस्तूंच्या दरांची यादी

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशात महागाईचा (inflation) मोठा भडका उडला आहे. पेट्रोल, डिझेलसह खाण्यापिण्यांच्या वस्तुंचे भाव गगनाला भिडले आहेत. या वाढत चाललेल्या महागाईने सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. अशाचत आता केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) यांनी देशातील महागाईचा दर नियंत्रित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून देशात महागाई कमी झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

पियुष गोयल यांनी महागाईत झालेल्या घटीच्या संदर्भात एक चार्ट आपल्या ट्विट अकाऊंटवर शेअर केला आहे. या चार्टनुसार, 2 एप्रिल 2022 रोजी पाम तेलाचे भाव 150 रुपये किलो होते. मात्र, आता एका वर्षानंतर त्यात 27 टक्क्यांनी घट झाली असून आता पाम तेलाचे भाव 109 रुपये किलो आहेत, असं सांगण्यात आलं आहे. तर कांद्याच्या दरात 25 टक्क्यांनी घट झाली असून एका वर्षापूर्वी कांदा 28 रुपये किलो विकल्या जायता, तर आता कांदा फक्त 21 रुपये किलो विकल्या जात असल्याचं त्यांनी सांगिलतं.

पुण्यात 12 एप्रिलला ‘रोजगार मेळावा’; दरमहा दुसऱ्या बुधवारी आयोजन

सुर्यफुल तेलाच्या किमतीत 19 टक्क्यांना घट झाली असून आता 148 रुपये किलो सुर्यफुल तेलाचे भाव आहेत. तर एका वर्षाआधी 183 रुपये किलो सुर्यफुल तेल होतं. याकाळात मोहरीच्या तेलात 18 टक्क्यांनी घट झाली असून आता मोहरी तेल 154 रुपये किलो मिळत आहे, तर एका वर्षापूर्वी हेच मसूर तेल 188 रुपये किलो मिळत असे. वनस्पती तुप एका वर्षापूर्वी 155 रुपये किलो मिळत असे तर आता वनस्पती तेलाचे भाव हे 16 टक्क्यांनी कमी झाले असून आता 130 रुपये किलो वनस्पती तेल मिळत आहे. सोयाबीन तेलात 15 टक्क्यांनी घट झाली असून 138 रुपये किलो सोयाबीन तेलाचे भाव आहेत. तर एका वर्षापूर्वी सोयाबीन तेलाचे भाव हे 162 रुपये किलो होते, असं या चार्टमध्ये सांगण्यात आलं.

आलूच्या दरात 15 टक्क्यांनी घट झाली असून आता 17 रुपये किलो आलूचे भाव आहेत. तर पूर्वी 20 किलो आलू होता. टोमॅटोच्या दरातही 13 टक्क्यांनी घट झाली आहे. आता टोमॅटो 21 रुपये किलो मिळतात.

डाळींच्या दरातही वाढ झाल्याचं या चार्टमध्ये सांगण्यात आलं आहे. चना डाळीच्या भाव आता 5 टक्यांनी कमी झाले असून 71 रुपये किलो मिळत आहे.
मसूर डाळ पूर्वी 96 रुपये किलो मिळायची, आता त्यात 4 टक्यांनी घट झाली असून आता 92 रुपये किलो मसूर डाळ मिळत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube