Download App

‘संजय राऊतांनी त्यावेळी सल्ला का दिला नाही?’ आदित्यनाथांचा परखड सवाल

Yogi Adityanath replies Sanjay Raut : अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा (Ram Mandir) अगदी जवळ आलेला असतानाच यावरून सुरू झालेले राजकारण मात्र थांबलेले नाही. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी श्रीराम मंदिराच्या बांधकामाबाबत केलेल्या दाव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) चांगलाच संताप व्यक्त केला. आयुष्यात मी एक गोष्ट पाळतो की मी मु्र्खांना उत्तर देत नाही, अशा शब्दांत त्यांनी संजय राऊतांना उत्तर दिले होते. त्यानंतर आता या वादात थेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उडी घेतली आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत अयोध्येत आले होते त्यावेळीच त्यांनी आपला अमूल्य सल्ला का दिला नाही? असा सवाल आदित्यनाथ यांनी विचारला आहे.

एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिर बांधकामाच्या जागेवरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिले. विरोधकांकडून केले जात असलेले दावे आणि आरोप चुकीचे आहेत. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे अयोध्येत दर्शनासाठी आले होते त्यावेळीच त्यांनी आपला अमूल्य सल्ला का दिला नाही असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी केला.

Ayodhya Ram Mandir: रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा थांबवा, थेट हायकोर्टात याचिका

अयोध्येनंतर आता काशी आणि मथुरा येथील वचन भाजप पूर्ण करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता आदित्यनाथ म्हणाले, हा विषय न्यायप्रविष्ट आहे. राम मंदिरासाठी 500 वर्ष मोठा संघर्ष केला. न्यायालयात लढाई देऊन विजय मिळवला. त्यानंतरच मंदिरांत रामललांची प्राणप्रतिष्ठा केली जात आहे. आता यापुढे न्यायालयाच्या माध्यमातूनच अन्य मुद्देही सोडवले जातील असे सूचक वक्तव्य योगी आदित्यनाथ यांनी केले.

काय म्हणाले होते संजय राऊत ?

मंदिर वही बनाएंगे असा नारा त्यावेळी भाजपने दिला होता. पण आता तुम्ही जाऊन पाहा मंदिर कुठं उभारलं आहे. आताचं मंदिर जिथं आश्वासन दिलं गेलं होतं त्याठिकाणी नाही तर त्यापासून चार किलोमीटर दूर अंतरावर बांधलं गेलं आहे. जिथे राम मंदिर बांधणार असं सांगितलं गेलं होतं तिथे ते मंदिर बांधले गेलेले नाही. ती वादग्रस्त जागा आजही तशीच आहे, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता.

Devendra Fadnavis : मी मुर्खांना उत्तरं देत नाही; राऊतांच्या ‘त्या’ दाव्यावर फडणवीसांचा संताप

follow us