Ram Mandir : 1800 कोटींच्या मंदिरासाठी 5 हजार कोटींचं दान; सर्वाधिक निधी कुणी दिला ?
Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारीला मोठा उत्सव होणार (Ram Mandir) आहे. या सोहळ्याची तयारी अगदी जोरात सुरू आहे. या दिवशी प्रभू श्रीरामांची मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या (Ayodhya Ram Mandir) क्षणाची आपण सगळेच आतुरतेने वाट पाहत आहोत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने तर 6 हजारांपेक्षा जास्त लोकांना आमंत्रण पाठवलं आहे. मंदिराच्या बांधकामासाठीही 1 हजार 800 कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे. परंतु, रामभक्तांनी भरभरून दान दिलं. ट्रस्टने सुरू केलेल्या बँक खात्यात आताच तब्बल 5000 कोटींचा निधी जमा झाला आहे. मंदिराच्या बांधकामासाठी 14 जानेवारी 2021 पासून एक भव्य दान अभियान सुरू करण्यात आले होते.
श्रीराम मंदिरासाठी अगदी गरीबातील गरीबापासून ते थेट मोठ्या उद्योगपतींपर्यंत प्रत्येकाने आपल्या इच्छेनुसार मंदिरासाठी मदत दिली. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार मंदिराच्या समर्पण निधी बँक खात्यात आतापर्यंत 5 हजार कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. ट्रस्टने देशातील 11 कोटी लोकांकडून 900 कोटी रुपये मदत निधी उभारण्याचे नियोजन केले होते. पण, मदतीचा ओघ इतका वाढला की पाहता पाहता हजारो कोटींचं दान मिळालं.
Ram Mandir उद्घाटनाकडे चारही शंकराचार्यांनी फिरवली पाठ; ‘या’ कारणामुळे अयोध्येला जाणार नाही
आतापर्यंत 18 कोटी रामभक्तांनी 5 हजार कोटी रुपये निधी दिला आहे. ट्रस्टच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी आतापर्यंत सर्वाधिक 11 कोटी 3 लाख रुपये दान अध्यात्मिक गुरू आणि कथावाचक मोरारी बापू यांनी दिले आहे. गुजरात येथील हिरे व्यापारी गोविंदभाई ढोलकिया यांनी सुद्धा 11 कोटी रुपये दान दिले आहे.
अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी धन संचय अभियानाची सुरुवात 14 जानेवारी 2021 रोजी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुरू केली होती. रामनाथ कोविंद यांनी सर्वात आधी पाच लाख रुपये दान दिले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 2 लाख रुपये मदत दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने 11 कोटींचा चेक ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्याकडे सुपूर्द केला.
आता तुम्हाला नक्कीच आश्चर्य आणि अभिमानही वाटेल. अगदी कमी पेन्शन मिळत असतानाही तेलंगणातील एका वयोवृद्ध महिलेने राम मंदिरासाठी 500 रुपये दान दिले. मध्य प्रदेशातील विदिशा येथील रहिवासी मुन्नीबाई खुशवाहा यांनीही राम मंदिराच्या निर्माणासाठी 100 रुपयांची मदत दिली. राम मंदिराच्या निर्माणासाठी माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरने एक कोटी रुपये दान दिले. दाक्षिणात्य अभिनेत्री प्रणिता सुभाषनेही एक लाख रुपये दिले. अभिनेते मुकेश खन्ना यांनी 1 लाख 11 हजार रुपये, चित्रपट निर्माते मनिष मुंद्रा यांनी एक कोटी रुपयांची मदत राम मंदिरासाठी दिली.
Ram Mandir : हिंदू कर्मचाऱ्यांना 22 जानेवारीला दोन तासांची विशेष सुट्टी : ‘या’ देशाची मोठी घोषणा
दक्षिण भारतीय चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते पवन कल्याण यांनीही 30 लाख रुपये मदत दिली. बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी, मनोज जोशी, अनुपम खेर, अक्षय कुमार, छोट्या पडद्यावरील कलाकार गुरमित चौधरी यांनीही आपापल्या परीने राम मंदिराच्या बांधकामासाठी मदत केली.