Uttar Pradesh : उमेश पाल हत्याकांडातील आरोपी उस्मानचा एनकाउंटर

प्रयागराज :  उत्तर प्रदेशच्या ( Uttar Pradesh )  प्रयागराज येथे उमेश पाल ( Umesh Pal ) हत्या प्रकरणासंदर्भात पोलिसांची कारवाई अदयाप चालू आहे. उमेश पालच्या हत्येनंतर आणखी एकाचा एनकाउंटर झाला आहे. या एनकाउंटरमध्ये विजय कुमार उर्फ उस्मान चौधरी याचा मृत्यू झाला आहे. उस्मान यानेच उमेश पाल याची हत्या केल्याची पोलिसांची माहिती आहे. प्रयागराजच्या कौंधियारा भागात […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 06T120229.035

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 03 06T120229.035

प्रयागराज :  उत्तर प्रदेशच्या ( Uttar Pradesh )  प्रयागराज येथे उमेश पाल ( Umesh Pal ) हत्या प्रकरणासंदर्भात पोलिसांची कारवाई अदयाप चालू आहे. उमेश पालच्या हत्येनंतर आणखी एकाचा एनकाउंटर झाला आहे. या एनकाउंटरमध्ये विजय कुमार उर्फ उस्मान चौधरी याचा मृत्यू झाला आहे. उस्मान यानेच उमेश पाल याची हत्या केल्याची पोलिसांची माहिती आहे.

प्रयागराजच्या कौंधियारा भागात पोलिस व उस्मान यांच्यामध्ये फायरिंग झाली होती. यावेळी उस्मानला गोळी लागली. यानंतर त्याला एसआरएन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. परंतु हॉस्पिटलला जाताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. विजय कुमार याने काही वर्षांपूर्वी धर्मपरिवर्तन केले होते व त्यानंतर तो उस्मान झाला होता.

Aditya Thackeray यांचा आर्शीवाद यात्रेवर हल्लाबोल; म्हणाले, ‘गद्दारांना कधी…’

उमेश पाल हत्याकांडनंतर हा दुसरा एनकाउंटर आहे. याआधी पोलिसांनी अतीक अहमदच्या जवळचा अरबाज याचा एनकाउंटर केला होता. उमेश पाल याच्या हत्येवेळी ज्या क्रेटाचा वापर करण्यात आला होता, तिला अरबाजच चालवत होता.

दरम्यान 24 फेब्रुवारी रोजी उमेश पाल व त्याचा दोन गनर्स यांची हत्या करण्यात आली होती. उमेश पाल हा राजू पाल हत्याकांडात कोर्टात साक्षी होता. उमेश आपल्या गाडीतून उतरताच गुंडांनी त्याच्यावर फायरिंग केली होती.

उमेश पाल यांच्या हत्येचा आरोप अतीक अहमदवर लागत आहे. अतीक हा सध्या साबरमतीच्या जेलमध्ये बंद आहे. अतीकने जेलमधूनच या हत्येचा कट रचल्याचा पोलिसांचा संशय आहे. अतीक अहमद हा राजूपाल हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. उमेश पाल हा राजूपाल हत्याकांडात आरोपी होता.

Exit mobile version