Aditya Thackeray यांचा आर्शीवाद यात्रेवर हल्लाबोल; म्हणाले, ‘गद्दारांना कधी…’
रत्नागिरी : भाजप आणि शिंदे गटाने काढलेल्या आर्शीवाद यात्रेवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी जोरदार टीका केली आहे. ‘मला त्यांच्यावर जास्त काही बोलायचे नाही. लोक त्यांच्याबद्दल बोलत आहेत. कुठेही गेले तरी लोक त्यांना आर्शीवाद द्यायला येत नाहीत. चोरांना कधी आर्शीवाद मिळत नाही.’ असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आर्शीवाद यात्रेवर (Arshivad Yatra) केला आहे.
खेडच्या सभेला सभा घेऊन उत्तर देणार असा इशारा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दिला होता. यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘ज्यांनी चिन्ह चोरले आहे. बाप चोरला आहे त्यांना कधी आर्शीवाद मिळत नाही. चोर हे चोर असतात, गद्दार हे गद्दार असतात. लोकांना हे माहिती आहे’, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
Ramdas Kadam : उद्धव ठाकरे यांना व्याजासकट उत्तर देणार, शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी कोळीवाड्यात जाऊन कोळी बांधवांची भेट घेतली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘आज मी लोकांशी बोलायला आलो नाही तर दर्शन घेण्यासाठी आलोय. लोक होळी मोठ्या प्रमाणात साजरी करीत आहेत. कोळीवाड्यात खुप उत्साहाचे वातावरण आहे.’
दरम्यान, ठाकरे गटाच्या शिवसंवाद यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपनं आशीर्वाद यात्रेचं आयोजन केलंय. त्याची सुरुवात काल घाटकोपरमध्ये शक्तिप्रदर्शन करुन झाली.
त्याचवेळी शिवसेना पक्ष नाव आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवगर्जना यात्रेतील पहिलीच जाहीर सभा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला.