पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरच्या स्टोरीत आणखी एक ट्विस्ट आला आहे. उत्तर प्रदेश एटीएसने ताब्यात घेतल्यानंतर एटीएसने अद्याप सीमाला जासूस ठरवलं नाही पण उत्तर प्रदेशातल्या मथुरामधील अवधेश गुरुजी अवध सरकारने सीमा ही जासूसच असल्याचा दावा केला आहे. बागेश्वर बाबांसारखचं अवधेश गुरुजींचाही दरबार भरतो. या दरबारात निघालेल्या चिठ्ठीतमधून त्यांनी ही भविष्यवाणी केलीयं. यासोबतच पंतप्रधाान नरेंद्र मोदी आणि श्रीकृष्णाच्या जन्मवादावरही अवधेश गुरुजींनी भविष्यवाणी केली आहे.
Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…
सीमा हैदरसंदर्भात भविष्यवाणी करताना अवधेश गुरुजी म्हणाले, सीमा हैदर एक पाकिस्तानी एजंट आहे. त्यामध्ये कोणताही संशय नाही, सीमाच्या चेहऱ्यावरील पडदा हटण्यासाठी अधिक वेळ लागणार नसून लवकरच तिचं सत्य समोर येणार असल्याचा दावाच अवधेश गुरुजींनी केला आहे. गुरुजींच्या या दाव्यामुळे देशभरातल्या जनतेला आत्तापर्यंत ‘गदर’ची स्टोरी असल्याचं वाटत होतं. पण आता जनतेचा सीमाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत असल्याचं बोललं जातंयं.
तसेच श्रीकृष्णाच्या जन्माविषयी त्यांनी भविष्यवाणी केली आहे. 2028-29 सालापर्यंत श्रीकृष्ण जन्माचा वाद मिटणार असून मस्जिद ज्या जागेवर आहे त्याच जागेवर श्रीकृष्णाचं भव्य मंदिर बांधण्यात येणार असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच जामा मस्जिदच्या पायऱ्यांमध्ये उत्खनन केल्यास सत्य समोर येणार असल्याचंही ते म्हणाले आहे.
दरम्यान, बागेश्वर बाबांप्रमाणेच अवधेश गुरुजींचा दरबार भरत असतो. या दरबारात चिठ्ठ्या काढल्या जातात. यंदाही त्यांनी आपल्या गोवर्धन दरबारामध्ये भाविक भक्तांच्या समस्यांचं निराकरण केलं आहे. याचदरम्यान, त्यांनी भगवान श्रीकृष्ण, सीमा हैदर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी भविष्यवाणी केली आहे. देशात 2024 साली पुन्हा भाजपचीच सरकार स्थापन होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच बनणार असल्याचंही ते म्हणाले आहेत.