Download App

Uttarakhand Flood : मोठी दुर्घटना! उत्तराखंडमध्ये पुरामुळे चार जणांचा मृत्यू; 15 लोक बेपत्ता

Uttarakhand Flood : उत्तर भारतातील काही राज्यांत पुराने थैमान घातले आहे. उत्तराखंड राज्याला या पुराचा मोठा फटका बसला आहे. गौरीकुंडजवळील दात पुलिया येथे मुसळधार पावसामुळे अचानक पूर आला. या पुरात चौघा जणांचा मृत्यू झाला तसेच पंधरा लोक बेपत्ता झाल्याची माहिती आहे. पाण्यात तीन दुकाने वाहून गेली आहेत.

या नंतर प्रशासनाने मदतकार्य युद्धरपातळीवर सुरू केले आहे. दरड कोसळण्यााचा धोका असलेल्या ठिकाणच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. गौरीकुंडजवळील पुरात चार जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती रुपनगरचे जिल्हा दंडाधिकारी सौरक्ष गहरवार यांनी दिली. या पुरात बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध सुरू आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून मदत व बचावकार्य राबविण्यात येत आहे.

लोकसभेच्या खासदारांनी ७ ते ११ ऑगस्ट दरम्यान सभागृहात उपस्थित राहावं; भाजपकडून तीन ओळींचा व्हिप

आज सकाळपासूनच दिल्ली आणि आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस होत आहे. उत्तराखंडजवळील बिहारमध्येही पाऊस होत आहे. काल शुक्रवारी राज्यातील अनेक जिल्ह्यात जोारदार पाऊस झाला. सीतामढी, दरभंगा, शिवहर, सुपौल, मधुबनी, किशनगंज आणि मधेपुरा जिल्ह्यांत पाऊस झाला. पुढील दोन दिवसात अररिया, किशनगंज आणि सुपौल जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

उत्तराखंडमध्ये मदतकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे. पुरात अडकलेल्या लोकांना वाचविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. गुरुवारी रात्री येथे मुसळधार पाऊस पडला. त्याचा परिणाम म्हणून नदीला पूर आला. या पुरात पंधरा जण बेपत्ता झाले आहेत. या बेपत्ता झालेल्या लोकांना वाचविण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहेत. वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. राज्य सरकारकडूनही वेळोवेळी माहिती घेतली जात आहे.

Tags

follow us

वेब स्टोरीज