Download App

Uttarkashi Tunnel Accident: उत्तरकाशी बोगदा दुर्घटनेत अदानींचा काय संबंध? अदानी समुहाकडून स्पष्टीकरण

  • Written By: Last Updated:

Uttarkashi Tunnel Accident: उत्तराखंडमधील उत्तरकाशी बोगद्यात (Uttarkashi Tunnel ) गेल्या 16 दिवसांपासून 41 मजूर अडकून पडले आहेत. या मजुरांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. परदेशी कंपन्या, सैन्य दलाची मदत घेण्यात आली आहे. या बोगदा दुर्घटनेप्रकरणात आता अदानी समुहाला काही जणांनी ओढले आहे. हा बोगदा अदानी समुहाकडून उभारण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर आता अदानी समुहाकडून (Adani Group) एक स्पष्टीकरण जाहीर करण्यात आलेय. या बोगद्याच्या निर्मितीशी अदानी समुहाचा काहीच संबंध नाही. तसेच कंपनीची गुंतवणूकही बोगदा तयार करत असलेल्या कंपनीत नाही, असे स्पष्टीकरण अदानी समुहाने एका प्रसिद्धीपत्रकात दिले आहे.


Rane-Kesarkar : 12 वर्षांत पहिल्यांदाच दोन वैरी एकत्र; तब्बल दीड तास खलबतं, चर्चांना उधाण

उत्तरकाशी बोगदा हा चार धाम योजनेतील एक हिस्सा आहे. या बोगद्याचे काम हैद्राबाद येथील नवयुग इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडचे आहे. ही कंपनी सीवी राव यांच्या नवयुग समुहाचा हिस्सा आहे. त्याचा अदानी समुहाशी काहीही संबंध नाही, असे अदानी समुहाने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अदानी समुहावर टीका करण्यात येत आहे.

भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्वीट केले आहे. उत्तराखंड येथील बोगदा कोणती कंपनी उभारीत होती. बोगद्याची दुर्घटना घडली तेव्हा कोण भागिदार तेथे उपस्थित होता. त्यामध्ये अदानींचे पण नाव आहे का ? मी विचारत आहे, सांगत नाही, असे स्वामी यांचे ट्वीट होते.

तर प्रशांत भूषण यांनीही अदानींचे नाव या बोगद्याच्या दुर्घटनेशी जोडले आहे. उत्तराखंड येथील बोगद्याचे काम कोणत्या कंपनीकडे आहे. नवयुग इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडबाबत काही माहिती समोर येत आहे. याकडे लक्ष्य देण्याची गरज असल्याचे भूषण यांनी ट्वीटमध्ये म्हटलेय. तर न्यूज क्लिकचे अभिसार शर्मा यांनीही अदानी समुहाशी संबंध असल्याने याची चौकशी केली जात नाही, असे म्हटले आहे. त्यानंतर अदानी समुहाने याबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर केले आहे.

Tags

follow us