Rane-Kesarkar : 12 वर्षांत पहिल्यांदाच दोन वैरी एकत्र; तब्बल दीड तास खलबतं, चर्चांना उधाण

Rane-Kesarkar : 12 वर्षांत पहिल्यांदाच दोन वैरी एकत्र; तब्बल दीड तास खलबतं, चर्चांना उधाण

Narayan Rane-Deepak Kesarkar : राजकारणातले दोन वैरी आज तब्बल 12 वर्षानंतर एकाच छताखाली आल्याचं पाहायला मिळालं आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातले दोन कट्टर स्पर्धक केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar) आज एकत्र आले आहेत. केसरकरांनी राणे यांच्या कणकवलीच्या निवासस्थानी भेट घेत तब्बल दीड तास चर्चा केलीयं. राजकारणातल्या 12 वर्षांच्या कारकीर्दीमध्ये दोन कट्टर स्पर्धेक पहिल्यांदाच एकत्र येत दीड तास चर्चा केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही नेत्यांच्या या भेटीचीच राजकारणात चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.

Supriya Sule : मंंत्र्यांना जरा आवरा, अन् जाहीर माफी मागा; भावी शिक्षकाला धमकी देणाऱ्या मंत्र्याला सुनावलं

नगरपालिकेपासूनच वादाला सुरुंग :
जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणुकीपासूनच राणे-केसरकर यांच्यात वाद उफाळून आला. या वादानंतर 2009 साली दीपक केसरकरांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर विधानसभेत गेले. पवारांच्या सांगण्यावरुन राणेंनी या निवडणुकीत केसरकरांना मदत केल्याचं या निवडणुकीत बोललं जात होतं. माझ्या मदतीनेच दीपक केसरकर सावंतवाडी मतदारसंघातून निवडून आले असल्याचं स्पष्ट केलं होतं. तर दुसरीकडे जिल्ह्यात राणे कुटुंबियांकडून नेहमीच दहशतवाद करण्यात आला असल्याचा गंभीर आरोप दीपक केसरकर यांनी केल्याचं पाहायला मिळालं.

Tiger 3 Offer: भाईजान-कतरिनाच्या चाहत्यांना मोठं गिफ्ट; ‘टायगर 3’च्या तिकिटावर बंपर ऑफर!

राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आल्यानंतर दीपक केसरकरांनी शिवसेनेत उडी घेतली. एकेकाळी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे समर्थक म्हणून दोन्ही नेत्यांची ओळख. एकाच पक्षात असूनही दोन्ही नेत्यांमध्ये वाद होता. भाजप-शिंदे गटाची युती होताच राज्यातील अनेक नेत्यांनी वाद मिटवून घेतले मात्र, या दोन्ही नेत्यांमधील वाद काही मिटल्याचं दिसलं नव्हतं. या काळात राणे कुटुंबियांकडून टीकेची झोड उठवण्यात आली होती.

2009 साली निवडणुकीत राणे यांनी केसरकरांनी मदत केल्याने 2014 च्या निवडणुकीत केसरकरांना राणेंना मदत करावी लागणार होती. मदत करावी लागणार म्हणून दीपक केसरकरांनी उडी मारली असल्याचा दावा नारायण राणेंकडून अनेकदा करण्यात आला. आधीच दोघांमध्ये वाद होताच त्यामुळेच 2014 साली दीपक केसरकरांनी शिवसेनेत प्रवेश केला. कारण नारायण राणे भाजपमध्ये आहेत. अशातच नारायण राणे यांच्यावर खुलेआम बोलता येईल म्हणूनच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचा दावा राणेंकडून करण्यात आला आहे.

ना बारामती, ना माढा! संधी मिळाली तर मला वर्ध्यातून लोकसभा लढवायला आवडेल; सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

भेटीचं कारण…
डीएड बेरोजगारांनी आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. या भेटीत बेरोजगारांनी आपल्या समस्या मांडल्या आहेत. त्यानंतरच नारायण राणे यांच्या निवासस्थानी दीपक केसरकरांनी धाव घेत भेट घेतली आहे. डीएड बेरोजगारांच्या प्रश्नांसाठी आज नारायण राणेंची भेट घेतली असून ही राजकीय भेट नाहीत. अनेकदा मार्गदर्शनासाठी राणे यांनी भेटत असतो, एक अनुभवी नेते म्हणून ते नेहमीच मार्गदर्शन करीत असल्याचं मंत्री दीपक केसरकरांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

आमच्या वैयक्तिक नाहीतर राजकीय संघर्ष..,:
राजकारणात असतानाच आमच्या कधीही वैयक्तिक संघर्ष नव्हता राजकीय, वैचारिक संघर्ष होता. मुंबईत आम्ही समोरासमोर भेटलो आहोत, आमचे एकमेकांशी चांगले संबंध, आमच्यात मतभेद नाहीत. तुम्ही दाखवा आमच्यात कधी मतभेद होते. त्यांनी सांगावं कधी आले भेटले नाहीत असं कधी झालं नाही. डीएडच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. डीएडचा कायमस्वरुपी परमनंट जॉबचं व्हावं, जो निर्णय रत्नागिरीला झाला तो इथेही व्हावा, असं राणेंनी बोलून दाखवलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube