Tiger 3 Offer: भाईजान-कतरिनाच्या चाहत्यांना मोठं गिफ्ट; ‘टायगर 3’च्या तिकिटावर बंपर ऑफर!

Tiger 3 Offer: भाईजान-कतरिनाच्या चाहत्यांना मोठं गिफ्ट; ‘टायगर 3’च्या तिकिटावर बंपर ऑफर!

Tiger 3 Tickets Sale Offer: बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री कतरीना कैफ (Katrina Kaif) यांचा ‘टायगर 3’ (Tiger 3) हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर चाहत्यांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी गल्ला कमावला आहे. चाहत्यांनी देखील या सिनेमाला मोठा प्रतिसाद दिला आहे. ‘टायगर 3’ हा सिनेमा प्रदर्शित होऊन आता 14 दिवस उलटून गेले असले तरी हा सिनेमा आपलं स्थान टिकवून आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash Raj Films (@yrf)


आता आणखी चाहत्यांनी या सिनेमाच्या दिशेने आपले प्रेम दाखवावे म्हणून खास गिफ्ट ठेवण्यात आली आहे. नुकतचं ही खास गिफ्टची ऑफर जाहीर करण्यात आली आहे. आता अर्ध्या किंमतीत चाहत्यांना ‘टायगर ३’ हा सिनेमा बघता येणार आहे. ‘टायगर ३’ हा सिनेमा आता जगभरात 500 कोटींचा टप्पा गाठणार आहे. तर, देशात देखील या सिनेमाने 265 कोटींचा गल्ला कमावला आहे. या निमित्ताने आता मेकर्सनी चाहत्यांना खास गिफ्ट दिली आहे.

या आठवड्याच्या मधल्या दिवसांत भाईजान आणि कतरिनाच्या चाहत्यांना ‘टायगर 3’ बघण्यासाठी खास ऑफर मिळणार आहे. जर, तुम्ही देखील कतरीना आणि भाईजान यांचे मोठे चाहते असाल, तर ही ऑफर अजिबात चुकवू देऊ नका. अवघ्या अर्ध्या किंमतीमध्ये आता तुम्हाला ‘टायगर 3’ मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे.

Sa Re Ga Ma Pa 2023 Winner : अल्बर्ट लेप्चा ठरला ‘सा रे ग म प 2023’चा विजेता! म्हणाला, ‘सपना सच हो गया’

यशराज फिल्म्सने एक नवी बंपर ऑफर जाहीर केली आहे. सोमवार 27 नोव्हेंबर ते गुरुवार 30 नोव्हेंबर या काळातच हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषेत हा सिनेमा अवघ्या 150 रुपयांत बघायला मिळणार आहे. या ऑफरमुळे आता चाहत्यांना अर्ध्या किंमतीत हा सिनेमा बघता येणार आहे. चाहते देखील ऑफर ऐकून आता आनंदी झाले आहेत. तसेच या सिनेमाचे तोंडभरून कौतुक करत आहेत.

‘टायगर 3’ या सिनेमात भाईजानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ, इमरान हाश्मी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत. हा सिनेमा 12 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर देखील जोरदार कमाई करताना पाहायला मिळत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube