Sa Re Ga Ma Pa 2023 Winner : अल्बर्ट लेप्चा ठरला ‘सा रे ग म प 2023’चा विजेता! म्हणाला, ‘सपना सच हो गया’

Sa Re Ga Ma Pa 2023 Winner : अल्बर्ट लेप्चा ठरला ‘सा रे ग म प 2023’चा विजेता! म्हणाला, ‘सपना सच हो गया’

Sa Re Ga Ma Pa 2023 Winner: झी टीव्हीचा ‘सा रे ग म प 2023’ चा (Sa Re Ga Ma Pa 2023) रविवार, 26 नोव्हेंबर रोजी महाअंतिम सोहळा पार पडला. यासह या कार्यक्रमाचा विजेता गायक अल्बर्ट लेप्चा (Albert Lepcha) ठरला आहे. अल्बर्ट हा संपूर्ण सीझनमध्ये, प्रेक्षकांचं जोरदार मनोरंजन केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee TV (@zeetv)


‘सा रे ग म प 2023’चा ग्रँड फिनाले खूपच धमाल होता. यंदाचं पर्वही खूप खास ठरलं आहे. हिमेश रेशमिया, नीती मोहन आणि अनु मलिक या पर्वाचे परिक्षक होते. तर रानिता बनर्जी, अल्बर्ट लेप्चा, सोनिया गॅम्जर, स्नेहा भट्टाचार्य आणि निष्ठा शर्मा हे स्पर्धक या पर्वात अंतिम टप्प्यात पोहचले होते. या सर्व स्पर्धकांमध्ये चांगलीच अटीतटीची लढत बघायला मिळाली आहे. यातून अल्बर्ट लेप्चाने ‘सारेगमप 2023’च्या ट्रॉफीवर आपल्या नावावर केली आहे.

ग्रँड फिनालेमध्ये अल्बर्ट काबो लेपचाला ‘सा रे ग म प 2023′ चा विजेता घोषित ठरला आहे. संपूर्ण सीझनमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या अल्बर्टला शोच्या जज आणि प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे. महाअंतिम फेरीदरम्यान अल्बर्टला ट्रॉफी देण्यात आली. फायनलिस्ट निष्टा शर्मा ही फर्स्ट रनर अप आणि रनिता बॅनर्जी सेकंड रनर अप ठरला आहे.

विजेतेपद पटकावल्यानंतर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे, म्हणाला,”सा रे ग म प 2023’ हा कार्यक्रम मी जिंकलो असल्याने खूप आनंदी आहे. मी जिंकलो असलो तरी या पर्वात सर्वच स्पर्धक खूपच उत्तम कामगिरी केली आहेत. उत्कृष्ट गायक आहेत. त्यामुळे तेही विजेते आहेत. ‘सा रे ग म प 2023’ची ट्रॉफी मी जिंकेल असं मला कधी वाटलं नव्हतं, ‘मेरा सपना सच हो गया’, अशी प्रतिक्रिया त्याने यावेळी दिली.

विक्रांत मॅसीचा ’12वी फेल’ ऑस्करवारीत, बॉक्स ऑफिसवरही दमदार कलेक्शन

पुढे म्हणाला की, 2015 मध्ये पूजासोबत लग्नबंधनात अडकला. त्याबद्दल बोलताना असताना तो म्हणतो,”सा रे ग म प 2023’ची ट्रॉफी जिंकल्यानंतर माझ्या कुटुंबियांना खूप आनंद झाला आहे. माझ्या बायकोने मला या संपूर्ण प्रवासात उत्तम साथ दिली आहे. बायको खंबीरपणे मला साथ देत माझ्या पाठिशी उभी होती. ‘सारेगमप 2023’ या कार्यक्रमात सहभागी व्हावं, अशी माझ्या बायकोची मोठी इच्छा होती. आता हा कार्यक्रम जिंकण बायकोचे स्वप्न साकार होण्यासारखं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube