Gram Panchayat Election Result : दीपक केसरकरांना मोठा धक्का; भाजप, ठाकरे गटाने मिळवला विजय

Gram Panchayat Election Result : दीपक केसरकरांना मोठा धक्का;  भाजप, ठाकरे गटाने मिळवला विजय

Maharashtra Gram Panchayat Election Result : आगामी काळात होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी आज (दि.6) हाती येणाऱ्या 2 हजार 300 ग्रामपंचायतींच्या निकालाकडे (Maharashtra Gram panchayat Election Result) सर्वांचे लक्ष लागले असून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार राज्यातील प्रमुख ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामध्ये कोकणातील सावंतवाडीमध्ये देखील हेच चित्र आहे. याठिकाणी मंत्री दीपक केसरकरांना धक्का बसला आहे, तर भाजप आणि ठाकरे गट सरस ठरला आहे.

आत्मपरिक्षण करावे! विधेयके अडवून ठेवण्यावर सुप्रीम कोर्टाने राज्यपालांना फटकारले

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालांमध्ये दोडामार्ग या ठिकाणी तीन तर वेंगुर्लेमध्ये चार ग्रामपंचायतसाठी मतमोजणी झाली. यामध्ये शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसला. तर दुसरीकडे भाजप आणि ठाकरे गटाने या ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले.

Israel and Hamas war : प्रियकराच्या मृतदेहासह ती… हमासच्या हल्ल्यात वाचलेल्या तरूणीने सांगितली आपबिती

त्यामुळे या ठिकाणी शिंदे यांच्या शिवसेनेला भोपळा देखील फोडताना आल्याचे चित्र आहे. यामध्ये वेंगुर्लेमधील चार पैकी तीन ग्रामपंचायतींवर भाजपने वर्चस्व मिळवले तर एका ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरे घाटाच्या शिवसेनेने वर्चस्व मिळाले. तर दुसरीकडे दोडामार्ग या ठिकाणी तीन पैकी एकावर भाजप तर दुसऱ्या दोन ग्रामपंचायतींवर ग्रामविकास आघाडीने विजय मिळवला.

‘राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी….’, भुजबळांच्या ऑडिओ क्लिपवर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

त्यामुळे केसरकर यांच्या मतदारसंघातील सात पैकी चार ग्रामपंचायती भाजपच्या तर एक ठाकरे गटाने इतर दोन या ग्रामविकास आघाडीकडे गेले आहेत. तर शिंदे गटाकडे एकही ग्रामपंचायत आलेली नाही. दरम्यान या सातही ग्रामपंचायत मध्ये शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपलं पॅनल निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं होतं. मात्र त्यांना एका ठिकाणी देखील यश मिळवता आलेले नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube