‘राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी….’, भुजबळांच्या ऑडिओ क्लिपवर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Rohit Pawar ON Chhagan Bhujbal : मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊन ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील श्(Manoj Jarange Patil) यांनी मोठी लढा उभारला. त्यांच्या लढ्याला काही प्रमाणात यश आलं असून ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची तयारी राज्य सरकारने दर्शविली. मात्र, या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ नाराज झाले आहेत. कालपासून त्यांची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ते आता करेंगे मरेंगे… तुम्ही आवाज उठवा, असंही मरतोय, तसंही मरतोय, आपण उभं राहिले पाहिजे, असं आव्हान करत आहेत. यावर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही यावर भाष्य केले.
Yeh Rishta Kya Kehlata Hai: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिका आजपासून ‘स्टार प्लस’ वाहिनीवर
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन सुरू केले आहे. आता जरंगे पाटील यांनी 24 डिसेंबरपर्यंत सरकारला मुदतवाढ दिली आहे, दरम्यान आता मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर आता मंत्री छगन भुजबळ यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामुळं आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. आज माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, छगन भुजबळ काय बोलले, त्यांची ऑडिओ क्लिप मी अद्याप ऐकलेली नाही. समाजा – समाजात तेढ निर्माण करून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याचा निषेध केला पाहिजे. कुठेही वाद होणार नाही याची दक्षता घ्यावी, असं रोहित पवार म्हणाले.
पुढं बोलतांना ते म्हणाले की, राजकीय अस्तित्व टीकवण्यासाठी जर कुणी वेगळ्या पद्धतीची भूमिका घेत असेल तर ते योग्य नाही. सगळ्यांचच मत आहे की, चर्चेतून मार्ग काढला पाहिजे, त्यामुळे ही व्हिडिओ क्लिप खरी की, खोटी आहे, याच्या खोलात न जात वाद होणार नाही, याची काळजी घ्यावी.
दरम्यान, आज छगन भुजबळ जालना दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यानी सरसकट प्रमाणपत्राला विरोध केला. यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या. आमचा आरक्षणाला विरोध नाही. आमच्या आरक्षणात तुम्ही येऊ नका. आमच्य 375 पेक्षा जास्त जाती आहेत. 54 टक्क्यांहून अधिक गरीब लोक आहेत. तुम्ही सगळ्यांनी एका आवाजात बोललं पाहिजे, बोलला नाहीत तर मुलांचं भविष्य धोक्यात आहे, असंही भुजबळ म्हणाले.
राज्यात मराठा आरक्षणावरुन पेटलेले वातावरण आता कुठे शांत होत असतानाच आता ओबीसी समाज आक्रमक होण्याची शक्यता आहे