रोहित पवारांना धक्का! कर्जत-जामखेडमधील 9 पैकी 5 ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व
अहमदनगर : राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायत निवडणुकीच्या (Gram Panchayat Elections) मतमोजणीला सुरुवात झाली असून आता निकाल हाती येत आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना कर्जत जामखेड ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. आमदार राम शिंदे (MLA Ram Shinde) यांच्या नेतृत्वाखाली कर्जत जामखेड तालुक्यातील एकूण 9 पैकी भाजपने 5 जागा जिंकल्या.
नव्या रूपातलं नवं बाईपण जपणारं झिम्मा २ मधील ‘मराठी पोरी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीस!
राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यात नगर जिल्ह्यातील 178 ग्रामपंचायतीसाठी आज मतमोजणी पार पडली. नगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये सहा तर जामखेडमध्ये तीन अशा नऊ ग्रामपंचायतीसाठी निवडणुका झाल्या. यामध्ये कर्जतमध्ये आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. कर्जतमध्ये भाजपच्या राम शिंदे यांचे वर्चस्व दिसून आल्याचे दिसते आहे. तर जामखेडमध्ये तीन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीला दोन जागांवर विजय मिळाला तर भाजपला एका जागांवर विजय मिळाला आहे. दरम्यान कर्जत जामखेड यांच्या नऊ ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे.
कर्जत-जामखेडमध्ये कर्जत जामखेड तालुक्यातील एकूण 9 पैकी भाजपने 5 जागा जिंकल्या. तर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याकडे 2 जागा गेल्या. अजित पवार गटाकडे एक आणि स्थानिक आघाडीला एक जागा अशा जागा मिळाल्या. या निवडणुकीत भाजपाचे विधानपरिषद आमदार राम शिंदे यांचं वर्चस्व कायम राहिलं.
आगामी निवडणूक पाहता रोहित पवारसांठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. तर राम शिंदे यांनी आगामी निवडणुकांपूर्वी आपले राजकीय वजन पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
लंके गटाचे पुंड विजयी
आमदार निलेश लंके यांच्या गटाचे पुंड विजयी नगर तालुक्यातील संवेदनशील मानल्या जाणाऱ्या अरणगाव ग्रामपंचायतीत आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखालील पॅनल विजयी झाला आहे. सरपंचपदी पोपट पुंड विजयी झाले आहे.
गुंजाळवाडीत थोरातांची विखेंवर मात
संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी ग्रामपंचायतीवर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या गटाने सत्ता काबीज केली आहे. नरेंद्र उर्फ अमोल गुंजाळ हे सरपंचपदी विजयी झाले आहेत. तर विखेपाटील गटाचा पराभव झाला आहे.