Uttarkashi Tunnel मधून मुलाच्या सुटकेची बातमी ऐकण्याआधीच वडिलांचं निधन; कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर

Uttarkashi Tunnel : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात (Uttarkashi Tunnel) अडकलेल्या 41 मजुरांना वाचविण्यात यश आले आहे. रॅट मायनिंगच्या माध्यमातून तब्बल 17 दिवसानंतर आज सर्व मजुरांना बाहेर काढण्यात आले आहे. मात्र यातील एका मजूराच्या बोगद्यातून बाहेर येण्या अगोदरच त्याच्या वडिलांचं निधन झालं आहे. मजुराच्या कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर… उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात (Uttarkashi Tunnel) […]

मुलाची बोगद्यातून सुटका पण बातमी ऐकण्याआधीच वडिलांनी सोडले प्राण; मजुराच्या कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर

Uttarkashi Tunnel

Uttarkashi Tunnel : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात (Uttarkashi Tunnel) अडकलेल्या 41 मजुरांना वाचविण्यात यश आले आहे. रॅट मायनिंगच्या माध्यमातून तब्बल 17 दिवसानंतर आज सर्व मजुरांना बाहेर काढण्यात आले आहे. मात्र यातील एका मजूराच्या बोगद्यातून बाहेर येण्या अगोदरच त्याच्या वडिलांचं निधन झालं आहे.

मजुराच्या कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर…

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात (Uttarkashi Tunnel) अडकलेल्या 41 मजुरांपैकी एक असेलेल्या भक्तू मूर्मू हा मजूर बोगद्यातून सुखरूप बाहेर पडला. त्यामुळे त्याच्या कुटुंबाच्या आनंदारा पारावार राहिला नाही. मात्र दुसरीकडे त्याच्या कुटुंबावर आणखी अक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तो म्हणजे गेले 17 दिवस आपल्या मुलाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या वडिलांचं निधन झालं आहे. बासेत उर्फ बारसा मूर्मू असं या मजूराच्या वडिलांचं नाव आहे. तर आपल्या मुलाची बोगद्यातून सुटका झाली आहे. ही बातमी ऐकण्याच्या अगोदरच त्यांचं निधन झालं आहे.

War 2: अ‍ॅक्शन सीन्सचा थरार अन्…; हृतिक रोशनच्या ‘वॉर 2’ सिनेमा ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

भक्तू मूर्मू हा मजूर झारखंडच्या पूर्वी सिंहभूम जिल्ह्यातील बांकीशोल तालुक्यातील बाहदा गावातील राहिवासी आहे. त्याचं वय 29 वर्ष तर त्याच्या वडिलांचं वय 70 वर्षे होतं. त्याचं मंगळवारी धक्क्याने निधन झालं. भक्तूला दोन भाऊ आहेत. ते देखील मजूरीसाठी बाहेरगावी राहतात. त्यामुळे वडिलांचं निधन झालं. तेव्हा एकही मुलगा त्यांच्या जवळ नव्हता.

मोदी लाटेत निवडून येणे सोपे राहिलेले नाही; मावळची जागा राष्ट्रवादीचीच! शेळकेंनी ठोकला शड्डू

दरम्यान बोगद्यातून बाहेर काढल्याच्या 24 तासांनंतर म्हणजे आज या मजुरांना त्या त्या राज्यांच्या प्रतिनिधिंकडे सोपविण्यात येणार आहे. त्यासाठी जॅप आयटीचे सीईओ भुवनेश प्रताप सिंह आणि राजेश प्रसाद उत्तरकाशीमध्ये जातील. मजुरांना डेहराडूनहून दिल्लीला आणले जाईल. अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या या मजूरांना झारखंड भवनमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यानंतर 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत त्यांना त्याच्या गावी पोहचविलं जाईल. मात्र या दरम्यान भक्तू मूर्मू या मजुराच्या कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कामगाराने सांगितलं 17 दिवसात काय घडलं?

तर 17 दिवसांनंतर सुखरूप बाहेर आल्यानंतर कामगारांच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही. यातीलच एक कामगार झारखंडचा रहिवासी असलेल्या सुबोध कुमार वर्माने बोगद्याच्या आत 17 दिवस कसे गेले त्याचा अनुभव सांगितला. तो म्हणाला की, सुरुवातीचे 24 तास आमच्या सगळ्यांसाठी अत्यंत जिकिरीचे होते. काय होईल काहीच सांगता येत नव्हतं. आम्हाला काही खायलाही मिळालं नाही. त्यानंतर मात्र कंपनीने पाईपद्वारे काजू,बदाम, किसमिस, पुडिंग असे खाद्यपदार्थ पाठवले. त्यानंतर पुढे दहा दिवसांनी जेवण पाठवले जाऊ लागले. या सतरा दिवसांत कंपनीने आमची काळजी घेतली. सर्वतोपरी मदत केली. त्यामुळे माझी कंपनीबाबत तक्रार नाही. सगळ्यांच्या प्रार्थना आमच्या पाठिशी होत्या. म्हणून मी आणि माझे सहकारी बाहेर येऊ शकलो.

Exit mobile version