साहिबगंज : रामनवमीच्या (Ram Navami) पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरसह अनेक राज्यात दंगली झाल्या होत्या. अद्यापही देशात कुठं ना कुठं धार्मिक मुद्यांवरून वातावरण चिघळवण्याचे प्रयत्न काही लोकांकडून होत आहेत. आता झारखंडमधील साहिबगंज येथील पटेल चौकाजवळ सोमवारी सकाळी काही बदमाशांनी एका धार्मिक स्थळाची तोडफोड केल्याची माहिती आहे. या तोडफोडीनंतर साहिबगंजमध्ये तणावाचे वातावरण आहे. परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसरातील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे.
साहिबगंजचे उपायुक्त रामनिवास यादव यांनी या घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, झारखंडची राजधानी रांचीपासून ४२५ किमी अंतरावर असलेल्या साहिबगंज नगर पोलीस स्टेशन परिसरात रविवारी रात्री ही घटना घडली. धार्मिक स्थळाची तोडफोड झाल्याची माहिती मिळताच सोमवारी पहाटे उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते आणि स्थानिक लोक तेथे जमले आणि त्यांनी या चोरट्याला अटक करण्याची मागणी सुरू केली. यावेळी त्यांनी सुमारे तासभर रास्ता रोको केला.
Ahmednagar : बाजार समितीसाठी शेवटच्या दिवशी दिग्गजांचे अर्ज, मातब्बरांमुळे निवडणूक लक्षवेधी ठरणार
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने असेही सांगितले की, यावेळी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. त्याचबरोबर प्रशासनाने खबरदारी घेत दिवसभरात इंटरनेट सेवा बंद केली आहे.
सध्या शहरातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे उपायुक्त रामनिवास यादव यांनी सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही सोमवारी सकाळी ९ वाजल्यापासून इंटरनेट सेवा २४ तासांसाठी बंद केली आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, आम्ही घटनेचे सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून त्याची पडताळणी करत आहोत. त्यांच्या मदतीने काही लोकांची ओळख पटली आहे. तसेच एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची सखोल चौकशी केली जाईल. गैरप्रकार करणाऱ्यांना कडक इशारा देत त्यांच्यावर जिल्हा प्रशासन कठोर कारवाई करेल, असे ते म्हणाले. दरम्यान, साहिबगंजचे पोलीस अधीक्षक अनुरंजन किस्पोटा म्हणाले की, परिसरात सुरक्षा दल तैनात करण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
शनिवारीही हाणामारी झाली
यापूर्वी शनिवारी साहिबगंज शहरात दुर्गा मूर्ती विसर्जनाच्या वेळी दोन समुदायांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर झालेल्या दगडफेकीत एक वरिष्ठ पोलीस अधिकारी जखमी झाला.
#WATCH | Jharkhand: Tension prevailed in Sahibganj after a Hanuman temple near Patel chowk was vandalised by miscreants earlier today. Additional Police forces deployed. pic.twitter.com/9v3PZ499hA
— ANI (@ANI) April 3, 2023