Download App

कोणत्याच देशाचा नागरिक नसलेल्या व्यक्तीचं काय होतं? जाणून घ्या, नियम अन् कायदे..

वनुआतू सरकारने त्यांनाही जोराचा झटका देत ललित मोदी यांची नागरिकता रद्द करण्याचाच आदेश देऊन टाकला.

Lalit Modi : ना घर का ना घाट का.. ही हिंदी भाषेतली म्हण सध्या एकाच व्यक्तीसाठी वापरता येईल तो म्हणजे व्यापारी आणि आयपीएलचे माजी संस्थापक ललित मोदी. नागरिकतेच्या संकटात अडकलेल्या ललित मोदी यांनी लंडन (lalit Modi) येथील भारतीय उच्चायोग कार्यालयात भारतीय पासपोर्ट परत करण्यासाठी अर्ज दिला होता. मोदींना वानुआतू या देशाची नागरिकता घेतली म्हणून त्यांनी हा अर्ज केला होता.

परंतु, वनुआतू सरकारने त्यांनाही जोराचा झटका देत त्यांची नागरिकता रद्द करण्याचाच आदेश देऊन टाकला. आता परिस्थिती अशी आहे की ललित मोदी यांच्याकडे ना भारताची नागरिकता आहे ना वनुआतूची. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर एखाद्या व्यक्तीकडे कोणत्याच देशाची नागरिकता नसेल तर काय होतं? जास्त विचार करत बसू नका प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर फक्त ही बातमी वाचा.

ललित मोदी सध्या लंडनमध्ये राहत आहे. वनुआतू या देशाची नागरिकता म्हणजे हा ललित मोदीसाठी सेफ झोन होता. पण, ही बातमी मिडियात येताच मोठी खळबळ उडाली. ललित मोदी यांना भारताने फरार घोषित केल्याचे लक्षात येताच वनुआतू सरकार खडबडून जागे झाले आणि थेट नागरिकता रद्द करण्याचा आदेश दिला. आता नागरिकता गेली म्हणजे नेमकं काय झालं हे आधी समजून घेऊ.

ललित मोदींना वानुआतूच्या पंतप्रधानांनी दिला मोठा धक्का, रद्द होणार नागरिकत्व, कारण काय?

नागरिकत्व गेलं याचा अर्थ काय

यूएनएचसीआरनुसार एखाद्या व्यक्तीकडे जर कोणत्याच देशाची नागरिकता नसेल तर तो व्यक्ती स्टेटलेस पर्सन म्हणून (Stateless Person) ओळखला जातो. अशा व्यक्तींची कायदेशीर स्थिती अत्यंत जटील असते.

अशा व्यक्तींकडे कोणत्याही देशात राहण्याचा अधिकार नसतो.

नागरिकत्व नसणारा व्यक्ती त्या देशातील सामाजिक सुविधांचा लाभ घेऊ शकत नाही.

कायदेशीर पद्धतीने परदेश प्रवास करण्यासाठी पासपोर्टही मिळत नाही.

अशा व्यक्तीला शरणार्थीचा दर्जा देणे किंवा देशात अस्थायी स्वरुपाचा व्हिसा द्यायचा की नाही याचा निर्णय संबंधित देशांच्या सरकारांचा असतो.

संयुक्त राष्ट्रांच्या 1954 मधील Stateless Persons Convention मध्ये अशा व्यक्तींना (United Nations) काही मुलभूत अधिकार देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पण हा निर्णय संबंधित देशांच्या सरकारांवर अवलंबून आहे. यामध्ये कुणीही बाहेरचे सरकार किंवा शक्ती हस्तक्षेप करु शकत नाही.

वनुआतू जगाच्या नकाशावर कुठे

दक्षिण प्रशांत महासागरातील वनुआतू (Vanuatu) हा एक बेट देश आहे. जवळपास 83 बेटे मिळून हा देश तयार झाला आहे. यातील 65 बेटांवर मानवी वस्ती आहे. हा देश ऑस्ट्रेलियाच्या पूर्व आणि न्यूझीलंडच्या उत्तर भागात किंवा ऑस्ट्रेलिया आणि फिजी या देशांच्या मध्ये स्थित आहे. वनुआतूची राजधानी पोर्ट विला देशातील सर्वात मोठे शहर आहे. ग्लोबल रेसिडेन्स इंडेक्सनुसार वनुआतू पासपोर्टवर 133 देशांत व्हिजा फ्री एन्ट्री मिळते. हेनले पासपोर्ट इंडेक्सनुसार वनुआतूचा पासपोर्ट 51 व्या क्रमांकावर आहे.

इनडोअर आणि आऊटडोअर दोन्ही प्रदूषण आरोग्यास हानिकारक; जाणून घ्या प्रतिबंधक उपाय | LetsUpp Marathi

आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे वनुआतू सरकार कोणत्याही व्यक्तीचे उत्पन्न, संपत्ती या कशावर कोणताही कर आकारत नाही. या देशात कोणताच कर नाही. म्हणूनच ललित मोदी यांनी या देशाची नागरिकता घेण्याचा विचार केला अशी चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार मागील दोन वर्षांत 30 श्रीमंत भारतीय नागरिकांनी वनुआतू देशाची नागरिकता घेतली आहे. या देशाची नागरिकता मिळवण्यात चीनी नागरिक आघाडीवर आहेत.

follow us