Actor Rajinikanth Health deteriorated : ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना काल रात्री उशिरा अचान पोटात वेदना जाणवू लागल्याने त्यांना चेन्नईतील अपोलो ग्रीम्स रोड रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Rajinikanth) त्यांच्या प्रकृतीबाबत चिंतेची परिस्थिती नसून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे.
रजनीकांत यांचं वय ७३ आहे. रजनीकांत यांच्या कुटुंबीयांकडून किंवा रुग्णालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तामिळनाडूतील चेन्नई पोलीस विभागानेही या घटनेची पुष्टी केली असून, त्यांनी सांगितलं की, पोटात तीव्र वेदनांमुळे रजनीकांत यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
Singham Again: पुन्हा एकदा दिसला सिंघमचा जलवा; रिलीज आधीच झाली इतक्या कोटींची कमाई!
रजनीकांत हे तामिळ आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज नाव आहे. त्यांच्या अभिनयाचं जगभरातील चाहत्यांवर गारूड आहे. त्यांना भारत सरकारने २००० साली पद्मभूषण आणि २०१६ साली पद्मविभूषण या राष्ट्रीय सन्मानांनी गौरवलं आहे. शिवाय, त्यांना शेवेलियर शिवाजी गणेशन पुरस्कारासह इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
भारताच्या ४५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात २०१४ साली त्यांना भारतीय चित्रपटातील शतकातील व्यक्तिमत्त्व म्हणून गौरविण्यात आलं. तसंच, २०१९ साली ५०व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांना ‘आयकॉन ऑफ ग्लोबल जुबली’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. एम. जी. रामचंद्रन यांच्या पाठोपाठ रजनीकांत हे तमिळ सिनेमा इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारे दुसरे अभिनेते आहेत.