Download App

Video : हिमाचलच्या कुल्लूमध्ये भुस्खलन; क्षणार्धात जमीनदोस्त झाल्या इमारती, अनेकजण अडकले

  • Written By: Last Updated:

शिमला : हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. गेल्या चोवीस तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील एका परिसरात भुस्खलन झाले असून, अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, अनेक नागरिक मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहेत. (Landslide In Himachal Pradesh Kullu Area Many People Trapped)

हिमाचलमधील अनेक भागांमध्ये पावसाची संततधार सुरू असून, हवामान विभागातर्फे 25 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे कुल्लू-मंडी महामार्गावर शेकडो वाहने अडकून पडली आहेत. पंडोह मार्गे पर्यायी मार्गाचेही नुकसान झाले असून, येथेदेखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार पावसामुळे आतापर्यंत 2,022 घरांचे नुकसान झाले असून 9,615 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. तर, पावसामुळे आतापर्यंत 113 भूस्खलनाच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे.  यामुळे हजारो नागरिक बेघर झाले आहेत. आतापर्यंत पावसामुळे 224 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

Tags

follow us