Narendra Modi In AI Impact Summit : मराठीमध्ये तडाखेबंद भाषण करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील AI समिटमध्ये मानव व्हिजन सांगितले आहे. काही लोक नवीन तंत्रज्ञानाबद्दल साशंक आहेत. मात्र, तरुण पिढी ज्या पद्धतीने एआय स्वीकारत आहे ते यापूर्वी कधीही पाहिले गेले नव्हते. एआय समिट प्रदर्शनानेदेखील प्रचंड उत्साह निर्माण केला आहे. १०० हून अधिक देशांचे प्रतिनिधित्व आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील मान्यवर शिखर परिषदेला यशाच्या नवीन उंचीवर घेऊन जात आहेत. या समिटमध्ये तरुण पिढीची उपस्थिती एक नवीन आत्मविश्वास निर्माण करत असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले. ज्या भारतात ही परिषद होत आहे तो भारत मानवतेच्या सहा पैलूंपैकी एकाचे प्रतिनिधित्व करतो. भारत जगातील सर्वात मोठ्या तरुण लोकसंख्येचे घर आहे. येथे सर्वात मोठा टेक टॅलेंट पूल असून, हे सर्वात मोठ्या टेक इनेबल्ड इकोसिस्टमचे उदाहरण आहे.
300 रुपयांचं डोमेन आणि 634 कोटींची ऐतिहासिक डील; AI.com ची भन्नाट स्टोरी
मोदींनी काय व्हिजन सांगितलं?
राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे इंडिया एआय इम्पॅक्ट समिटचे उद्घाटन करताना मोदी म्हणाले की, मानवी इतिहासात असे काही वळणे आली आहेत ज्यांनी संपूर्ण शतके बदलली आहेत. या वळणांनी संस्कृतीचा मार्ग बदलला आहे आणि विकासाचा वेग बदलला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे इतिहासातील असेच एक वळण आहे. एआय मशीन्सना बुद्धिमान बनवत आहे. शिवाय, ते मानवी क्षमतांमध्येही वाढ करत असल्याचे मोदी म्हणाले.
गुगलचं गणित पक्कं! खास टेक्निकने तयार होतो मॅप; AI चा सपोर्ट मिळतो का? जाणून घ्याच..
दृष्टी जितकी मोठी तितकी जबाबदारी मोठी
आजचा खरा प्रश्न हा नाही की भविष्यात एआय काय करू शकते. तर सध्या आपण एआयचे काय करतो हा प्रश्न आहे. आज, मशीन लर्निंगपासून लर्निंग मशीनपर्यंतचा प्रवास जलद, खोल आणि व्यापक आहे. म्हणूनच, आपल्याकडे एक व्यापक दृष्टीकोन आणि तितकीच व्यापक जबाबदारी असली पाहिजे. सध्याच्या पिढीसोबतच, आपण भविष्यातील पिढ्यांसाठी एआयचे कोणते स्वरूप देणार आहोत याची देखील काळजी घेतली पाहिजे.
इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये १०० हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. यामध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा, अबू धाबीचे युवराज शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान, श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके आणि मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांच्यासह संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस अनेक देशांचे नेते आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गज सहभागी झाले आहेत.
