Shahid Afridi Explosive Criticism On India : भारतावर कायम गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, नेहमीप्रमाणे तो भारताविरुद्ध गरळ ओकताना दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओध्ये अफ्रिदीने भारताला चार गुजराती चालवत असून, त्यातले दोघे जण विकत आहेत आणि दोघं जण खरेदी करत असल्याचे विधान केले आहे.
भारताविरोधातील सामन्यावर बहिष्कार टाकल्यानंतर आयसीसीने पाकिस्तानला सुनावले खडेबोल
व्हायरल व्हिडिओत नेमकं काय?
पाकिस्तानी टीव्ही चॅनेल ‘समा’वरील एका कार्यक्रमादरम्यान भारताविरुद्ध गरळ ओकताना आफ्रिदी म्हणाला की, “भारताला चार गुजराती चालवत आहेत. दोघे विकत आहेत आणि दोघे विकत घेत आहेत. हे चार जे गुजराती आहे ते अनेक देशांमध्ये बदनामीचे कारणदेखील ठरले आहे. तळाशी काम करणाऱ्या लोकांना या चौघांना खूश करायचे असेल, तर गोष्टी अशा प्रकारे चालत नसल्याचेही आफ्रिदी सांगताना दिसून येत आहे.
नेहमीप्रमाणे पाकिस्तानचा यू-टर्न
2026 च्या टी-20 विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना गेल्या काही काळापासून वादाचा विषय ठरला आहे. पाकिस्तानने 15 फेब्रुवारी रोजी भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती, परंतु आता पाकिस्तानने नेहमीप्रमाणे आपल्या निर्णयावर यू-टर्न घेत खेळण्यास सहमती दर्शविली आहे. दरम्यान, शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यात तो नेहमीप्रमाणे भारताविरुद्ध गरळ ओकतांना दिसत आहे. Shahid Afridi Explosive Criticism On India
बांगलादेशला सम्मान द्या, भारताचा उल्लेख करत शाहिद आफ्रिदी ICC वर भडकला…
पाकिस्तानचे खेळाडू आनंदी होते कारण…
टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान एकाच गट अ मध्ये आहेत. दोन्ही संघ 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळणार आहेत. पाकिस्तानने सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर, सूर्यकुमार यादवने स्पष्टपणे सांगितले की, विरोधी संघ आला किंवा नाही तरी टीम इंडिया सामना खेळेल. भारत सुरुवातीपासूनच ठाम राहिला, परंतु अखेर पाकिस्तानला माघार घ्यावी लागली. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू सुरुवातीला आनंदी होते की त्यांच्या देशाने भारताविरुद्ध खेळण्यास नकार दिला. त्यांना वाटले की यामुळे बीसीसीआय किंवा आयसीसीवर दबाव येईल, परंतु त्याऐवजी, पीसीबीवर दबाव वाढला आणि शेवटी, त्यांना भारताविरुद्ध खेळण्यास सहमती द्यावी लागली.
Pakistani reporter asked to Shahid Afridi🎙; Why we lose every single time against India, It's now become a dream to win against India…
Shahid Afridi🎙; "Hum p@ida hi harne ke lie hue hai"…Phle hum haarte the ab humare ladke haar rhe h😭😂🔥
— Gillfied⁷ (@Gill_Iss) February 10, 2026
