Download App

Video : PM मोदींकडून देशाला मूर्ख बनवायची प्रेरणा घेतली का?; विजयी टीम इंडिया राऊतांच्या रडारवर

पाकिस्तान सोबत खेळण्याला देशाचा विरोध आहे ही लोकभावना आहे. राष्ट्रभक्तांनी कालचा सामना पाहिलेला नाही.

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut On Team India Asia Cup Victory : कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पराभावाची छूळ चारली. टीम इंडियाच्या या मोठ्या विजयानंतर देशभरात आनंदाचे वातावरण आहे.  मात्र, कट्टर प्रतिस्पर्ध्याला पराभूत करणारी टीम इंडिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या रडारवर आली आहे. जय शाह आल्यापासून भारतीय क्रिकेट बोर्डवर महाराष्ट्रातील खेळाडू दिसत नाहीत. हे ठरवून सुरू आहे का? हा प्रश्न मराठी माणसाने स्वतःला विचारला पाहिजे की असे का होत आहे? अनेक भारतीय क्रिकेटच्या संस्थांमधून महाराष्ट्राला दूर करण्याचे काम पद्धतशीरपणे सुरू आहे, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केलाय.

पंतप्रधानांकडून प्रेरणा घेतली का?

मैदानावर स्वरूप वेगळं आहे आणि आतलं स्वरूप वेगळं आहे. तुम्ही कोणाला मूर्ख बनवत आहात? तुम्ही पंतप्रधानांपासून देशाला मूर्ख बनवायची प्रेरणा घेतली आहे का? असा थेट सवाल राऊतांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना विचारला आहे. तसेच हे आता लोकांसमोर येणे गरजेचे आहे. तुम्ही सामना खेळलाच का? असेही राऊतांनी विचारले आहे.

ही नौटंकी आहे. तुम्ही मैदानावर एकत्र खेळत आहात, ज्याला देशाचा विरोध आहे. पाकिस्तान सोबत खेळण्याला देशाचा विरोध आहे ही लोकभावना आहे. राष्ट्रभक्तांनी कालचा सामना पाहिलेला नाही. काल अनेक ठिकाणी सामना दाखवायचा प्रयत्न झाला तेव्हा लोकांनी तो प्रयत्न हाणून पाडला. भारतीय खेळाडूंनी आधी काहीतरी हस्तांदोलन केले नाही. अरे पण तुम्ही खेळलात ना.

राऊतांनी शेअर केला नक्वींसोबतचा व्हिडिओ

आशिया कप जिंकल्यानंतर काल (दि.28) भारतीय संघाने  मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास स्पष्ट नकार दिला. भारतीय संघाच्या या भूमिकेला देशभारतून पाठिंबा मिळत आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय संघाने पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता. त्यानंतरदेखील भारतीय संघावर टीका करण्यात आली होती. मात्र, नक्वी यांच्याकडून ट्रॉफी न स्वीकारणाऱ्या याच टीम इंडियाने नक्वी यांच्याशी पंधरा दिवसांपूर्वी हस्तांदोलन केल्याचे तसेच फोटो काढल्याचे राऊतांनी म्हटले आहे.

याचा व्हिडिओदेखील राऊतांनी एक्सवर पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी काल तुम्ही नक्वी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. पण तुम्ही खेळलात ना. पंधरा दिवसांपूर्वी त्याच मोहसीन नक्वीसोबत याच भारतीय संघाने फोटो काढले, हस्तांदोलन केलं. मग तुम्ही देशाला काय मूर्ख बनवताय का? मोहसीन नक्वी ज्या कौन्सिलवर आहेत त्या कौन्सिलवर भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील पुढारीदेखील असल्याचे राऊतांनी म्हटले आहे.  

 

follow us