पाकिस्तान की लाडके उद्योगपती… भारत सरकार ट्रम्पला मध्यस्थी घालून कोणाला वाचवतंय? संजय राऊतांचा सवाल

Sanjay Raut Criticized Indian government On Pakistan : भारत पाकिस्तानमधील युद्धबंदीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मध्यस्थी केल्याचं समोर येतंय. यावरून मात्र खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भारत सरकारवर निशाणा साधलाय. माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटलंय की, ट्रम्प यांनी मध्यस्थी केली असं सांगण्यात येतंय, हे चुकीचं. ट्रम्प यांच्या सूचनेनंतर भारताने युद्धबंदी (India Pakistan War) स्वीकारली. डोनाल्ड ट्रम्प याचा सबंध काय? माणसं आमची मेली, मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण (Operation Sindoor) झाल्याशिवाय ट्रम्प मध्यस्थीत कोणत्या अधिकाराने करतात?
भारत स्वतंत्र राष्ट्र आहे, असं ट्रम्प सांगतात आणि आम्ही युद्ध बंद करतो. कोणत्या आधारावर आणि अटी शर्थीवर बंद केलं, ते सांगा. पूर्ण बदला घेणार, पाकिस्तानचे तुकडे करणार ही भाषेत मोदींची होती. पाकिस्तानचे तुकडे कुठे गेले? भारताची जगामध्ये बेअब्रू झालेली आहे. पाकिस्तानच्या प्रधानमंत्रीचा स्टेटमेंट, आम्ही युद्ध जिंकलो. अकलेचे दिवे पाजळणाऱ्या भारताच्या पंतप्रधानांना हे शोभत नाही. कोणत्या अटी-शर्तीवर तुम्ही युद्ध थांबवलं? यासाठी सर्व पक्ष बैठक घ्यावी. त्या बैठकीला पंतप्रधान यांनी उपस्थित राहणं आवश्यक आहे. त्यांना पळ काढता येणार नाही.
युद्धबंदीची खरंच गरज होती का? कराचीसह इतर ठिकाणी बॉम्ब टाकले, असे सांगत होते, मग माघार घ्यायची गरज का? ही वेळ पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवण्याची होती. भारतीय सैन्याचा मनोबल उंचावलेलं असताना देशाच्या राजकीय नेतृत्वाने अचानक कच खाल्ली. प्रेसिडेंट ट्रम्पसाठी सैन्याचा आणि देशाचे मनोबल उध्वस्त केलं. स्वतंत्र राष्ट्राच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याचा ट्रम्पला अधिकार काय ? गुजरातचे मुख्यमंत्री मोदी असताना 26/ 11 हल्ल्या वेळी हे सांगत होते की, ओबामाकडे जाऊन हे रडतात, वाचवा म्हणून आता मोदी, अमित शहा ट्रम्प कडे जाऊन रडत आहेत का? ज्यांचं सिंदूर पुसला त्याचा आणि हुतात्माचा यांचा अपमान यांनी केलेला आहे. माघार घ्यायची गरज नव्हती.
ऑपरेशन सिंदूर ते युद्धबंदी… 86 तासांत पाकिस्तान भारतासमोर कसे गुडघे टेकले?
आपण टोकाला जाऊन पोहोचलो असताना अशा प्रकारचा घात करणे, हे कोणाच्यातरी दबावाखाली आणि कोणाला तरी फायदा पोहोचावा यासाठी युद्धबंदी जाहीर केली. भारत सरकारने काहीच केलं नाही. भारत सरकार ट्रम्पला मध्यस्थीत घालून पाकिस्तान की लाडक्या उद्योगपतींना वाचवत आहे. नुकसान पाकिस्तानचं नाही आमचं झालंय, ट्रम्पने इस्त्राईल आणि गाजा पट्टी युद्ध का नाही थांबवलं ? ट्रम्प हे ठामपणे इस्रायलच्या मागे उभे आहेत. मात्र मोदींचे मित्र ट्रम्प भारताच्या मागे उभे राहिले नाही. दोन्ही देशांसोबत चांगले संबंध आहेत असे, त्यांनी सांगितले
मोदी पाचशे देश फिरून आले, मात्र भारताचा मित्र कोण त्यांनी सांगावं. या युद्धाला ठामपणे पाठिंबा देणारा एकही देश दाखवा. चीन, तुर्कीस्तान यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला. मात्र, मोदी जगात फिरत असतात तरी कोणत्या देशाने पाठिंबा दिला आहे? अमेरिकेच्या पापाने वॉर का थांबवला, हा पापा त्यांचा असेल देशाचा नाही. त्यांनी त्यांचा पापा घेत बसावं. आम्हाला त्याच्याशी काही घेणे देणे नाही. मात्र, देशाची वेळ अब्रू अन् भावना दुखावल्या आहेत.
नरेंद्र मोदी यांचा राजीनामा मागितला पाहिजे. मोदी यांनी देशासोबत विश्वास घात केला आहे. अमित शहा गृहमंत्री असताना अजूनही अतिरेकी सापडले नाही. त्यांचाही राजीनामा घेतला पाहिजे. मोहन भागवत यांनी प्रवचन देऊ नये, ते राष्ट्रभक्त असतील तर सगळ्यात अगोदर त्यांनी राजीनामा मागावा. इंदिरा गांधी असत्या, तर पाकिस्तान राहिलं नसतं. पाकिस्तानचे सैन्य गुडघे टेकलेले आम्ही पाहिलेले आहेत. पाकिस्तान सांगतो, आम्ही युद्ध जिंकलो. ही त्यांची हिंमत कशासाठी होते? भारताचे मिसाईल कुठे पडले? रामदेव बाबा लाहोरला पतंजलीची फॅक्टरी उघडणार होते, असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय.