Vijay Shekhar Sharma यांनी पेटीएम बँकेचे अध्यक्षपद सोडले ! नव्या बोर्डातही नसणार

Paytm Payment Bank : आरबीआयने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकवर (Paytm Payment Bank) प्रतिबंध घातल्यानंतर पेटीएमला धक्कांवर धक्के बसत आहेत. पेटीएमचे संस्थापक अध्यक्ष विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वन 97 कम्युनिकेशनच्या अंतर्गत पेटीएम ही कंपनी असून, या कंपनीने भांडवल बाजाराला सोमवारी ही दिली आहे. आता पेटीएम पेमेंट बँकेच्या बोर्डाची […]

Vijay Shekhar Sharma यांनी पेटीएम बँकेचे अध्यक्षपद सोडले ! नव्या बोर्डातही नसणार

Vijay Shekhar Sharma

Paytm Payment Bank : आरबीआयने (RBI) पेटीएम पेमेंट्स बँकवर (Paytm Payment Bank) प्रतिबंध घातल्यानंतर पेटीएमला धक्कांवर धक्के बसत आहेत. पेटीएमचे संस्थापक अध्यक्ष विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वन 97 कम्युनिकेशनच्या अंतर्गत पेटीएम ही कंपनी असून, या कंपनीने भांडवल बाजाराला सोमवारी ही दिली आहे. आता पेटीएम पेमेंट बँकेच्या बोर्डाची नव्याने रचना केली जाणार आहे.

वीस वर्षांनंतर राज्यात 11 हजार शिक्षकांची पदभरती, शिक्षण आयुक्तांची माहिती

लवकरच नव्या व्यक्तीची अध्यक्ष म्हणून नेमणूक केली जाणार आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन श्रीधर, निवृत्त सनदी अधिकारी देवेंद्रनाथ सारंगी, बँक ऑफ बडोद्याचे माजी कार्यकारी संचालक अशोककुमार गर्ग आणि निवृत्त सनदी अधिकारी सेखरी सिब्बल यांना पेमेंट बँकेच्या बोर्डमध्ये घेतले जाणार आहेत. ते स्वतंत्र संचालक असतील. त्या व्यतिरिक्त पंजाब अॅण्ड सिंध बँकेचे माजी कार्यकारी संचालक अरविंदकुमार जैन आमि पेटीएम बँकेचे व्यवस्थापक संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुरिंदर चावला यांचाही समावेश आहेत.

Sonu Sood Post: शाळा आणि शिक्षणाच्या उभारणीसाठी सोनू सुदचे नवे पाऊल, म्हणाला….

सध्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यूपीआय चॅनला थर्ड पार्टी प्रोवाइडर बनण्यासाठी वन 97 कॅम्युनिकेशनची चौकशी करत आहे. याची मंजुरी मिळाल्यास पेटीएमच्या ग्राहकांना भविष्यात यूपीआय सर्विस मिळणार आहे.

आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेवर अनेक निर्बंध घातले आहेत. याबाबतचा आदेश आरबीआयने 31 जानेवारीला काढले आहेत. त्यानंतर 29 फेब्रुवारीपासून ग्राहकांना खाते, वॉलेट, फास्टॅग आणि नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डवर व्यवहार करण्यास थांबविण्यात आले होते. परंतु आता ही तारीख 15 मार्च इतकी करण्यात आली आहे. पेटीएममध्ये विजय शेखर शर्मा यांचे 51 टक्के शेअर्स आहेत.

Exit mobile version