लेट्सअप विशेष : भाजपचा मास्टर स्ट्रॅटेजिस्ट! तावडे बिहारप्रमाणे केरळमध्येही तोच करिष्मा दाखवू शकणार?

Vinod Tawde केरळमध्ये भाजपला यश मिळवून देणार? तोच करिष्मा दाखवू शकणार का? याचं उत्तर निवडणुकीच्या निकालनंतरचं मिळेल.

Vinod Tawade

Vinod Tawade

Vinod Tawde Appointed As Election Incharge For Kerala Assembly Elections will he win as like Bihar : गेल्या काही महिन्यांपूर्वी भाजपने बिहार विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर एकाच नावाची चर्चा होती ती महाराष्ट्र भाजपचे नेते विनोद तावडेंची याचं कारणंही खास होतं ते म्हणजे बिहारच्या विजयाचे शिल्पकार हे तावडेच होते. तसेच त्यांना या कामगिरीचं बक्षीस म्हणून त्यांना भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं जाणार असल्याच्या चर्चांना तेव्हा उधान आलं होतं. आता मात्र भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची कोणतीही चर्चा नसताना अचानक मंगळवारी नितीन नबीन यांची बिनविरोध भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली एकीकडे भाजपने तावडेंना पुन्हा एखादा बाजूला सारल्याच्या चर्चा असताना त्यांची पुन्हा एकदा पुर्वी प्रमाणेच निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी त्यांना केरळ जिंकायचं आहे. होय कारण तावडे प्रभारी असले की, निवडणुका जिंकतातच अशी त्यांची ओळख झाली आहे. या मागची इतिहास नेमका काय? ते निवडणुका कशा प्रकारे जिंकतात जाणून घ्या सविस्तर…

सुरूवातीला पाहूयात विनोद तावडेंच्या राजकीय प्रवासातील काही लक्षवेधी घडामोडी 1980 ते 1995 या काळात त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम केले. 1995 मध्ये पक्षात सक्रिय झाल्यापासून महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, मुंबई अध्यक्ष, विधान परिषदेचे 13 वर्षे सदस्य, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि 2014 मध्ये बोरिवली विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले. फडणवीस सरकारमध्ये मंत्री असलेल्या तावडे यांनी शिक्षण, युवक कल्याण व क्रिडा, उच्च व तंत्रशिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विभाग, संसदीय कार्य असे विविध विभाग एकहाती सांभाळले.

त्यानंतर मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी फक्त आपला चेहरा पुढे ठेवत. खडसे, मुंडे आणि बावनकुळेंसह विनोद तावडे यांचं तिकीट कापण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर भाजपने त्यांना राष्ट्रीय सचिव आणि काही दिवसांतच राष्ट्रीय महासचिव म्हणून जबाबदारी देत त्यांचे संघटनेमध्ये राष्ट्रीय पातळीवर पुनर्वसन करण्यात आलं. याशिवाय चंदीगड आणि बिहारचे प्रभारीपद त्यांच्याकडे देण्यात आलं.

या संधीचं सोनं त्यांनी कसं केलं पाहूयात त्यात नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभेमध्ये तावडेंची रणनितीने भाजपला कसं बंपर बहुमत मिळवून दिलं. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप जदयु महायुतीला सुमारे 202 जागा मिळाल्या. बिहारमध्ये भाजप आणि जेडीयू यांना हे बहुमत न भूतो ना भविष्यती असं होतं. बिहारमध्ये गुंतागुंतीचं राजकारण आहे. पण तावडेंनी यादव , मुस्लीम आणि दलितांना सोबत ठेवत जातीय तर नितीशकुमार अन् पासवानांनासोबत ठेवत राजकीय समीकरणं जूळवलं अन् भाजप आणि जेडीयू यांना अविश्वसनीय यश मिळवून दिलं.

यासाठी तावडे आणि टीम 2022 पासून रणनीती आखून होते. त्यासाठी ग्राऊंडवर काम असो की राजकीय समीकरणं जुळवण्याच्या त्यांच्या हातोटी त्यांनी प्रत्येक ठिकाणी चुणूक दाखवली. भाजपची साथ सोडलेल्या नितीश कुमारांची संपर्क कायम ठेवला अन् तेजस्वी यादव आणि नितीश कुमारांमधील धुसफूस वाढतीच संधी साधली.

त्या अगोदर तावडे महाराष्ट्र विधानसभेच्यावेळी जरा नकारात्मक पद्धतीने चर्चेत आले मात्र त्याआधी लोकसभेला देखील त्यांनी झिरो टू हिरो अशी झेप घेतली होती. त्यावेळी चर्चा झाली होती ती तावडेंनी लोकसभेच्या भाजप उमेदवारांची वाचून दाखवलेल्या यादीची कारण याच तावडेंना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारली होती. त्याच तावडेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या तब्बल 115 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली.

त्या अगोदर तावडेंनी फेब्रुवारी 2024 मध्ये बिहार प्रमाणेच चंदीगड महापालिकेत पण या ठिकाणी भाजपच्या चालाखीचा एक व्हिडीओ व्हायरलं झाला ज्यामध्ये आपची मत ठरवून बाद केली जात होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर अत्यंत पारदर्शीपणे निकाल देत भाजपला सणसणीत चपराक लगावली होती.

मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये यश मिळवल्यानंतर भाजपने प्रस्थापितांना बाजूला सारत नवे चेहरे मुख्यमंत्रिपदावर आणले. राजस्थानची विशेष जबाबदारी असलेल्या तावडे यांनी भजनलाल शर्मांसारखा पहिल्यांदा आमदार झालेला चेहरा मुख्यमंत्री म्हणून दिला. याठिकाणी तावडेंचा खरं कस लागला. कारण येथे त्यांना वसुंधरा राजे या प्रस्थापित आणि राज घराण्यातील नेत्याला सांभाळून काम करायचं होतं पण तावडेंनी राजे यांची समजूत काढून त्यांना शांत करण्यात आपले राजकीय कसब पणाला लावले

त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत तिकीट कापल्यानंतर ज्या तावडेंचे राजकारण संपले संपले असे वाटत होते. मात्र त्या तावडेंनी राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या संधीचं सोन करत मागच्या तीन ते चार वर्षांमध्ये भाजपला हिमाचल प्रदेशपासून राजस्थान, हरयाणा, उत्तराखंड, बिहार आणि चंदीगड अशा बऱ्याच अवघड मोहिमा फत्ते करुन दिल्या अन् ज्याप्रमाणे वाजपेयी, अडवाणींसोबत प्रमोद महाजनांचं नाव होतं तसं आता मोदी शहांनंतर तावडे हे नाव जोडंलं आहे.

मात्र आता तावडेंना मिळालेली केरळची मोहीम तशी जोखमीची आहे कारण तावडेंकडे जरी निवडणुका जिंकण्याची हातोटी असली तरी केरळ हा भाजपसाठी कधीही न सुटलेला प्रश्न आहे. कारण हे राज्य मूळत: काँग्रेस डाव्यांचं आहे. येथे भाजपचे धार्मिक ध्रुविकरण आणि हिंदी भाषिकांचा भाजप ही ओळख त्यांना अडवते त्यामुळे भाजपला यश मिळवून देणारे विनोद तावडे केरळमध्येही तोच करिष्मा दाखवू शकणार का? याचं उत्तर निवडणुकीच्या निकालनंतरचं मिळेल.

Exit mobile version