Download App

“मुलायमसिंगाचा गौरव करणारे Veer Savarkar व Balasaheb Thackeray या दोन हिंदुहृदयसम्राटांना विसरले” सामनामधून भाजपवर टीका

  • Written By: Last Updated:

पुणे : “जिवंतपणी करसेवकांचे हत्यारे म्हणून त्यांची अवहेलना करणाऱ्या भाजप सरकारला मुलायम यांना मरणोत्तर सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची गरज भासली.” अशा शब्दांत सामनाच्या (Samana) अग्रलेखातून मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे.

याच अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, “अयोध्या आंदोलनात त्यांनी करसेवकांवर गोळय़ा चालवून जो रक्तपात घडविला त्यामुळे ते देशभरातील हिंदू समाजाचे शत्रूच बनले ते कायमचे. मुलायमसिंग (Mulayam Singh Yadav) यांनी गोळीबार केला नसता तर संतापाचा भडका उडून हिंदू रस्त्यावर उतरला नसता व त्याचा राजकीय फायदा उत्तरेत भाजपास झाला नसता. ते ऋण फेडण्यासाठीच मुलायमसिंग यांना पद्मविभूषणाने सन्मानित केले काय? हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व वीर सावरकर यांना या वेळी तरी ‘भारतरत्न’ने सन्मानित केले जाईल असे वाटले होते. मात्र तसे घडले नाही. सावरकरांच्या अपमानाचे राजकारण करणाऱ्या भाजपास वीर सावरकरांचा सन्मान करण्यापासून कोणी रोखले आहे? ”

कारसेवकांचे रक्त सांडणाऱ्यांचा सन्मान, पण…

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) व वीर सावरकर (Veer Savarkar) यांना या वेळी तरी ‘भारतरत्न’ने सन्मानित केले जाईल असे वाटले होते. मात्र तसे घडले नाही. सावरकरांच्या अपमानाचे राजकारण करणाऱ्या भाजपास वीर सावरकरांचा सन्मान करण्यापासून कोणी रोखले आहे? अयोध्येत करसेवकांचे रक्त सांडणाऱ्यांचा सन्मान केला जातो; पण ‘होय, बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आणि गर्व आहे,’ अशी गर्जना करून अयोध्या आंदोलनात प्राण फुंकणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मात्र मोदी सरकारला विसर पडतो.

हिंदुहृदयसम्राटांना मात्र विसरून गेले

अग्रलेखाच्या शेवटी म्हटले आहे की, “मुलायमसिंग यादवांचा गौरव करणारे मोदी शासन वीर सावरकर व बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदुहृदयसम्राटांना मात्र विसरून गेले. लोकांनी या घटनेचे स्मरण ठेवायला हवे.”

Tags

follow us