Viral Video : चेहऱ्यावर स्मित हास्य अन् मुखात शायरी, सुंदर दिसणाऱ्या मॉडेलनं 3 कोटी जनतेला मूर्ख बनवलं

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ "तन्वी जोशी" नावाच्या इन्ट्रा प्रोफाइलवरून इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

Viral Video : चेहऱ्यावर सुंदरता अन् मुखात शायरी सुंदर दिसणाऱ्या मॉडेलनं 3 कोटी जनतेला मूर्ख बनवलं

Viral Video : चेहऱ्यावर सुंदरता अन् मुखात शायरी सुंदर दिसणाऱ्या मॉडेलनं 3 कोटी जनतेला मूर्ख बनवलं

AI Model shayari viral video : चेहऱ्यावर नितळ सौंदर्य अन् मुखी शायराना अंदाज असणाऱ्या एका मॉडेलमुळे चक्का 3 कोटी यूजर्स मूर्खात निघाले आहेत. ऐकून आश्चर्य वाटलं ना? शायरीचे बोल काय होते ‘खानदानी रईस रखते हैं मिजाज नरम अपना… तुम्हारा लहजा बता रहा है कि तुम्हारी दौलत नई-नई है’. नेमकी ही मॉडेल कोण तिने 3 कोटी यूजरला कसं मूर्खात काढलं व्हायरल होणाऱ्या व्हिडिओचं सत्य नेमकं काय? त्याबद्दल जाणून घेऊया..

NDTV इंडियाने प्रकाशित केलेल्या बातमीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ “तन्वी जोशी” नावाच्या इन्ट्रा प्रोफाइलवरून इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये पिवळ्या कुर्ता घातलेली एक महिला उर्दूमध्ये शायरी ऐकवताना दिसत आहे. व्हायर होणाऱ्या या व्हिडिओला एका दिवसात 3 कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

तन्वी जोशी नावाची व्यक्तीचं नाही

एकीकडे तन्वी जोशी नावाच्या प्रोफाईलवरून सादर झालेल्या शायरीचे चर्चा जोरदार सुरू असताना मात्र, अशा नावाची व्यक्तीच प्रत्यक्षात नसून, शायरी सादर करणारी व्यक्ती ही AI मॉडेल असल्याचे समोर आले आहे. या प्रोफाईलवरून आतापर्यंत शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओंमध्ये चेहराजरी माणसाप्रमाणे हुबेहूब दिसत असला तरी, अन्य व्हिडिओमध्ये आवाज वेगवेगळा असल्याचे सांगितले जात आहे.

AI मॉडेलचा आवाज ठाण्यातील व्यक्तीचा

अल्पावधित व्हायर होणाऱ्या या व्हिडिओबाबत अजून एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये वापरण्यात आलेला आवाज हा ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेविका मर्जिया शानू पठाण यांचा असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी इंस्टाग्रामवर एका कार्यक्रमात हीच शायरी ऐकवल्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्याला जवळपास 9 लाख व्ह्यूज मिळाले होते. ज्यावेळी तन्वी जोशी या प्रोफाईलवर AI व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा पठाण यांनी “अरे, हा माझा आवाज आहे” अशी टिप्पणी केली. त्यावेळी लाईक आणि शेअर करणाऱ्या 3 कोटी यूजर्सला खरं सत्य समजलं.

AI व्हिडिओंनी वाढवली चिंता

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या घटनेवरून एआय-निर्मित चेहरे, आवाज आणि सादरीकरणं इतकं वास्तववादी होतयं की ते खरं आहे हे ओळखणे कठीण होत आहे. यामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, सोशल मीडियावर तुम्ही जे काही पाहता ते खरे नसते हेच अधोरेखित होत आहे. त्यामुळे एआय तंत्रज्ञान जसजसे पुढे जात आहे तसतसे डिजिटल कंटेंटचा अर्थ लावताना सावधगिरी बाळगणे अधिक महत्त्वाचे होत चालले आहे हे मात्र नक्की.

Disclaimer : सदर बातमी सोशल मीडियावरील यूजर्सच्या पोस्टवर आधारित असून, लेट्सअप मराठी या मजकुराची सत्यता पडताळत नाही.

Exit mobile version