Download App

Tirupati Balaji च्या दर्शनाला जाताना घ्यावी लागणार ‘ही’ काळजी

Hyderabad Tirupati Balaji : आंध्र प्रदेशातील तिरूमाला तिरूपती बालाजी हे देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानापैकी एक आहे. त्याचबरोबर येथे देशभरातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक या तिरूपती बालाजीच्या दर्शनाला येत असतात. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था या मंदीर प्रशासनाकडून घेतली जाते. त्याच पार्श्वभूमीवर आता या मंदीरात जाताना भाविकांना विशेष काळजी घ्यावी लागणार असल्याचं मंदीर प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

Mumbai : तिकीटाचे 6 रुपये परत न करणे महागात; रेल्वे क्लर्कच्या नोकरीवर कायमची गदा

भाविकांना काय काळजी घ्यावी लागणार?

आता भाविकांना जर पायी तिरूपती बालाजीच्या दर्शनाला जायचे असेल तर त्यांना आपल्यासोबत एक काठी किंवा लाकडी छडी बाळगायची आहे. असा निर्णय मंदीर प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. ज्याप्रमाणे भाविक हाजीमलंगला जाताना जवळ काठी बाळगतात तशीच आता पायी तिरूपती बालाजीच्या दर्शनाला जायचे असेल तर आपल्यासोबत एक काठी किंवा लाकडी छडी बाळगायची आहे.

Chandrayaan3 पासून लँडर वेगळे; चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगचा प्रवास सुरू

यामुळे बाळगावी लागणार काठी…

पायी तिरूपती बालाजीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना आपल्यासोबत एक काठी किंवा लाकडी छडी बाळगायची आहे. कारण गेल्या आठवड्यामध्ये पायी तिरूपती बालाजीच्या दर्शनाला आलेल्या एका सहा वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी मंदीर प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शंभर भाविकांमागे एक सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर पायी येणाऱ्या भाविकांना काही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जंगली जनावरांना आकर्षित करतील अशा खाण्या पिण्याच्या वस्तू कुठेही टाकू नयेत. दूकानदारांनी देखील असा कचरा टाकू नये. तसेच माकडांना खाऊ घालू नये. तसेच पाऊल वाटेवर कुंपण लावण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाला पाठवण्यात आला असल्याचं मंदीर प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

Tags

follow us