Download App

आम्हाला आणखी मदत करा… युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे पंतप्रधान मोदींना पत्र!

Volodymir Zelensky letter to PM Modi :  भारताकडून युक्रेनसाठी आणखी मदत करण्यात यावी, अशी मागणी युद्धग्रस्त युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. युक्रेनचे प्रथम उप परराष्ट्र मंत्री एमीन झापारोवा यांनी त्यांचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी लिहिलेले पत्र भारताच्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांना सुपूर्द केले आहे. हे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने लिहिण्या आले आहे. रशियासोबत वर्षभरापासून युद्धाचा सामना युक्रेन करत आहे. त्यामुळे भारताकडे औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि इतर मानवतावादी मदतीची मागणी यक्रेनने केली आहे.

परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्यासोबत युक्रेनच्या मंत्र्यांच्या भेटीदरम्यान, दोन्ही देशांमधील पुढील आंतर-सरकारी आयोग परस्पर सोयीच्या तारखेला आयोजित करण्यात येईल यावर सहमती झाली आहे. युक्रेनच्या मंत्र्यांनी युक्रेनमधील पायाभूत सुविधांची पुनर्बांधणी ही भारतीय कंपन्यांसाठी एक संधी असू शकते, असा प्रस्तावही मांडला.

द्विपक्षीय अजेंड्यात आर्थिक, संरक्षण, मानवतावादी सहाय्य, परस्पर हिताचे जागतिक मुद्दे समाविष्ट आहेत. निवेदनानुसार, तिने (जापरोवा) युक्रेनमधील सद्यस्थितीची माहिती दिली आणि परस्पर सोयीच्या तारखेला कीव येथे पुढील परराष्ट्र कार्यालय-स्तरीय सल्लागार बैठक आयोजित करण्यास सहमती दर्शविली.

गायक लकी अलीने हिंदू बांधवांची माफी का मागितली…?  – Letsupp

भारताच्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी सांगितले की, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. भारताच्या दौऱ्यावर असलेल्या युक्रेनच्या प्रथम उप परराष्ट्र मंत्री एमिने झापारोवा यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत हे पत्र माण्याकडे सुपूर्द केले आहे.

भारताने युक्रेनला औषधे, वैद्यकीय उपकरणे पुरवली आहेत. तसेच भविष्यात शाळेच्या बसेस आणि इतर साहित्य पुरवणार आहे. परराष्ट्र कार्यालयातील सल्लामसलतांची पुढील फेरी परस्पर सोयीस्कर तारखेला किवमध्ये घेण्यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयातील सचिव (पश्चिम) संजय वर्मा यांनी सांगितले. तसेच द्विपक्षीय चर्चेदरम्यान झापरोवा यांनी आर्थिक, संरक्षण, मानवतावादी सहाय्य तसेच परस्पर हितसंबंधांच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली आहे.

Tags

follow us