प. बंगाल ममता अन् तामिळनाडूत स्टॅलिन भाजपचा थेट सामना! आज मतदान कोण मारणार बाजी?

W. Bengal Tamil Nadu Assembly Election देशातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे.

West Bengal Tamil Nadu Assembly Election

West Bengal Tamil Nadu Assembly Election

West Bengal Tamil Nadu Assembly Election Trunmul DMK and BJP Direct fight : देशातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यामध्ये पश्चिम बंगालमधील पहिल्या टप्प्यातील 152 जागांसाठी तर 29 एप्रिलला दुसरऱ्या टप्पांसाठी 142 जगांसाठी मतदान पार पडेल. तर तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या सगळ्या 234 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे.

राहुरी पोटनिवडणुकीसाठी सकाळी सात वाजेपासून मतदान सुरु! कशी आहे व्यवस्था?

प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप यांच्या थेट सामना रंगणार आहे. त्यात आज होणाऱ्या मतदानासाठी भाजपने सगळ्याच म्हणजे 152 जागांवर उमेदवार दिले आहेत. तर तृणमूल्य 148 जागांवर उमेदवार दिलेले आहेत. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूलचे गेले पंधरा वर्षांपासून बंगालमध्ये सत्ता आहे. ही सत्ता संपुष्ट करण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बंगालमध्ये जणू तळ ठोकून आहेत. तर ममता बॅनर्जी यांच्याकडून देखील आपले सत्ता टिकवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत.

दादांशिवाय कुठलीच गोष्ट… मतदानानंतर दादांच्या आठवणींनी सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर

तर दुसरीकडे तामिळनाडू या देखील महत्त्वाच्या राज्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या सगळ्या 234 जागांसाठी आज मतदान पार पाडणार आहे. यामध्ये अन्नाद्रमुकाचे 166 तर भाजपचे 33 जागांवर उमेदवार आहेत तर अभिनेता विजयाच्या टीव्हीकेने 233 उमेदवार दिले आहेत. या ठिकाणी सत्ताधारी प्रमुख पक्षाला भाजप प्रणित आघाडी एनडीए आणि अभिनेता विजयचं मोठं आव्हान आहे. तर दुसरीकडे केंद्रातील भाजप सरकारने आपले पाय दक्षिणेत आणि तामिळनाडूमध्ये रोवण्यासाठी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विरोधकांकडून महिला आरक्षण विधेयक देखील बघितले जात आहे.

Exit mobile version