राहुरी पोटनिवडणुकीसाठी सकाळी सात वाजेपासून मतदान सुरु! कशी आहे व्यवस्था?

Rahuri by-election राज्यामध्ये आज राहुरी आणि बारामती या पोटनिवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

Akshay Kardile

Rahuri by-election Voting begins at 7 am! How are the arrangements : राज्यामध्ये आज राहुरी आणि बारामती या पोटनिवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात अक्षय कर्डिले (भाजप), गोविंद मोकाटे (शरद पवार गट), संतोष चोळके (वंचित बहुजन आघाडी) या प्रमूख राजकीय पक्षांसह अपक्ष म्हणून रावसाहेब खेवरे (ठाकरे गटाचे बंडखोर), सुरेश लांबे, महेश हापसे, अथर्व म्हसे असे एकूण सात उमेदवार राहिले आहेत.

दादांशिवाय कुठलीच गोष्ट… मतदानानंतर दादांच्या आठवणींनी सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर

सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू होणार असून,374मतदान केंद्रावर मतदान पार पडणार आहे. यामध्ये 3 आदर्श मतदार केंद्र,1 पुर्णपणे महिला संचलित केंद्र,1 दिव्यांग केंद्र अशी व्यवस्था करण्यात आली आहे. राहुरी विधानसभा निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने 36 पोलीस अधिकारी,708 पोलीस कर्मचारी, 391 होमगार्ड आणि केंद्रीय राखीव दलाची एक असा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

आज राहुरी अन् बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान! सुनेत्रा पवार अजितदादांच्या स्मृतीस्थळी तर कर्डिलेंनी केलं मतदान

यावेळी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत असून भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी सकाळीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक होत आहे.स्व.शिवाजीराव कर्डिले यांनी केलेले कामे आणि जनतेचा त्यांच्यावर असलेला विश्वास ज्या माध्यमातून आपल्याला जनता निवडून देईल असा विश्वास अक्षय कर्डिले यांनी मतदानानंतर व्यक्त केला आहे.

follow us