Download App

राहुल गांधींच्या खासदारकीची वाट अद्यापही बिकटच! राष्ट्रवादीच्या सदस्याला 2 महिने पहावी लागली होती वाट

Rahul Gandhi News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलासा देणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता राहुल गांधींना खासदारकी बहाल करण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, मोदी अडनावाप्रकरणी राहुल गांधींवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाली. मात्र, राष्ट्रवादीच्या लोकसभा सदस्याला दोन महिने वाट पहावी लागली असल्याचं उदाहरण समोर आहे, त्यामुळे आता राहुल गांधींच्या खासदारकीची वाट अद्यापही बिकच असून राहुल गांधी तत्काळ खासदारकी मिळेल का? यात शंका व्यक्त करण्यात आहे.

निवडणुकांसाठी आम्ही सुद्धा तयारच पण…; लांबलेल्या निवडणुकांवर फडणवीस स्पष्टच बोलले

एका खूनाच्या प्रकरणात लक्षद्वीपचे राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांना न्यायालयाने 10 वर्षांची सुनावली होती. त्यानंतर 25 जानेवारी रोजी फैजल यांना केरळ उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थिगिती दिली. 13 जानेवारी रोजीच्या न्यायालयाच्या निकालानंतर फैजल यांची 11 जानेवारीपासून लोकसभेचं सदस्यतत्व रद्द करण्यात आलं होतं. त्यानंतर 29 मार्च रोजी फैजल यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर लोकसभेच्या अध्यक्षांनी फैजल यांना खासदारकी बहाल करण्याच्या निर्णयाला विलंब लावल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर तब्बल दोन महिन्यानंतर फैजल यांना खासदारकी बहाल करण्यात आली होती.

Amit Shah in Pune: मोदींनंतर अमित शाह यांचाही पुणे दौरा… मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही असणार उपस्थित

राहुल गांधी यांच्या मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली होती. त्यावरुन आता राहुल गांधींनाही सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे राहुल गांधींना पुन्हा खासदारकी मिळणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. खासदार फैजल यांना ज्या प्रक्रियेनूसार पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली, तशीच प्रक्रिया राहुल गांधींच्या बाबतीतही असणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Tags

follow us