Ujjain Mahakal Temple : उज्जैन येथील महाकाल मंदिरात मोठी दुर्घटना (Ujjain Mahakal Temple) घडली असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, महाकाल मंदिराच्या गेट क्रमांक चारजवळील भिंत कोसळली असून या अपघतात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर 4 जण जखमी झाले आहे. सध्या घटनास्थळी मदतकार्य सुरु करण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी महाकाल मंदिराजवळील गेट क्रमांक चारसमोर भिंत कोसळली आणि या अपघातात भिंतीजवळ असणारे दुकानदार जखमी झाले आहे. या अपघातात चार दुकानदार जखमी झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच उज्जैनचे जिल्हाधिकारी एसपी आणि मंदिर प्रशासनासह महाकाल मंदिर प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
#WATCH | Madhya Pradesh: 2 people dead and 3 injured after a wall collapsed in Ujjain due to heavy rain
(Visuals from the spot) https://t.co/A09efNbcUk pic.twitter.com/nQM7JwSERN
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) September 27, 2024
महायुतीचं ठरलं, 225 जागांवर एकमत, ‘या’ दिवशी होणार घोषणा
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. भिंत अपघातात जखमी झालेल्या शारदाबाई (वय 40) आणि रुही वय (3) यांना बॉम्बे हॉस्पिटल, इंदूर येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर जयसिंग पुरा येथील फरहीन (22 वर्षे) आणि शिवशक्ती नगर येथील अजय (27 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे.