बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मध्य प्रदेश कनेक्शन, उज्जैन आणि ओंकारेश्वरमध्ये मुंबई पोलिसांचे छापे
Baba Siddique Murder: राज्याचे माजी मंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची 12 ऑक्टोबर रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी एक आरोपी उत्तर प्रदेश आणि एक हरियाणामधला आहे. तर एकाला आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. तर आता बाबा सिद्दीक हत्या प्रकरणात मध्य प्रदेश (Madhya Pradesh) कनेक्शन समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी मध्य प्रदेशातील उज्जैन (Ujjain) आणि खंडवा (Khandwa) जिल्ह्यात छापे टाकले आहेत. मुंबई पोलिसांचे एक पथक बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी रविवारी मध्य प्रदेशात पोहोचले. या बाबत पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांचे एक पथक मध्य प्रदेश पोलिसांच्या सहकार्याने फरार आरोपीचा शोध घेत आहे. तो मध्य प्रदेशात लपून बसला असल्याचा संशय मुंबई पोलिसांना आहे. त्यामुळे रविवारी मुंबई पोलिसांनी उज्जैन आणि ओंकारेश्वर येथे फरार आरोपीचा शोध घेतला मात्र संध्याकाळी 7.30 वाजेपर्यंत आरोपी सापडला नसल्याची माहिती एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिली आहे. तसेच फरार संशयित आरोपी सतत त्याचे ठिकाण बदलत असल्याची देखील माहिती अधिकाऱ्याने पीटीआयला दिली आहे.
पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे तर या हत्येत आणखी लोकांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी 15 पथके तयार केली आहेत जी महाराष्ट्राबाहेर आरोपींचा शोध घेत आहे. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दोन पिस्तूल आणि 28 काडतुसे जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
झारखंडमध्ये तीन तर महाराष्ट्रात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका? ‘या’ दिवशी होणार घोषणा
12 ऑक्टोबर शनिवारी रात्री वांद्रे भागातील खेर नगरमध्ये बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आणि आमदार जीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर तीन जणांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या त्यानंतर त्यांना उपचारासाठी लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला होता मात्र तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.