माऊली कटकेंच्या उज्जैन वारीची शिरुरमध्ये चर्चा; आतापर्यंत 15 हजार जणांना लाभ, सहाव्या ट्रेनचे 28 सप्टेंबरला प्रस्थान

माऊली कटकेंच्या उज्जैन वारीची शिरुरमध्ये चर्चा; आतापर्यंत 15 हजार जणांना लाभ, सहाव्या ट्रेनचे 28 सप्टेंबरला प्रस्थान

शिरूर : तालुक्यात सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक माऊली कटके आयोजित उज्जैन वारीची जोरदार चर्चा सुरु आहे. या मोफत दर्शन यात्रेच्या माध्यमातून आजपर्यंत तब्बल 15 हजार नागरिकांनी उज्जैन दर्शन घेतले आहे. याच यात्रेच्या सहाव्या टप्प्यातील भाविकांच्या ट्रेनचे 28 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता प्रस्थान होणार आहे. सहाव्या टप्प्यात शिक्रापूर, सणसवाडी जिल्हा परिषद गट, तळेगाव-ढमढेरे जिल्हा परिषद गट, शिरूर शहर आणि शिरूर तालुक्यातील पाबळ केंदूर जिल्हा परिषद गट आणि या सर्व गटातील 14 गावांमधील शेकडो भाविकांचा समावेश आहे.

श्रावण महिन्याच्या निमित्ताने शिरूर आणि हवेली तालुक्यातील नागरिकांसाठी माऊली कटके यांनी उज्जैन येथे महाकालेश्वरांचे दर्शन घेण्यासाठी मोफत यात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेसाठी असंख्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत महाकाल बाबांचे दर्शन घेतले. या प्रतिसादानंतर कटके यांनी श्रावण महिना संपल्यानंतरही ही यात्रा पुढे चालू ठेवली.

दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात हजारो नागरिकांनी महाकालेश्वरांचे दर्शन घेतले. पहिल्या टप्प्यात मांडवगण, शिक्रापूर, न्हावरा, शिरुर, सोलापूर रोड आणि वाघोली या भागातील गावांचा समावेश होता. दुसऱ्या टप्प्यात थेऊर फाटा, तिसऱ्या टप्प्यात शिरूर शहर-न्हावरा जिल्हा परिषद गट, चौथ्या टप्प्यात लोणीकंद पेरणे, वाडेबोल्हाई जिल्हा परिषद गट व गटातील 20 गावांचा, पाचव्या टप्प्यात रांजणगाव सांडस- तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गटातील यात्रेकरूंचा सहभाग होता. आता सहाव्या टप्प्याच्या ट्रेनचे 28 सप्टेंबर रोजी प्रस्थान होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube