मशीन्स नाही तर त्यांना चालवणारे सैनिक युद्ध जिंकतात! सीएएटीसच्या परेडमध्ये लेफ्टनंट जनरल सेठ यांचं प्रतिपादन

Lieutenant General Seth यांनी नाशिकमध्ये कॅडेट्सना संबोधित केलं. त्यांनी सांगितलं की, युद्ध मशीन्समुळे नाही सैनिकांमुळे जिंकले जातात.

Lieutenant General Seth

Lieutenant General Seth

Wars are won not by machines but by soldiers who operate them Lieutenant General Seth’s response at the CAATS parade : नाशिकमध्ये सीएएटीसच्या परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी भारतीय सैन्याचे साउदर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इम-चीफ लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी पास आऊट होणाऱ्या कॅडेट्सना संबोधित केलं. सेठ यांनी स्पष्ट सांगितलं की, खरी युद्ध मशीन्स नाही तर त्यांना चालवणाऱ्या सैनिकांचं साहस, कौशल्य आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे जिंकले जातात.

भाजपला माणसांची नाही पैशांची गरज; बंडखोर पुतण्याला पाठिंबा देत माजी खासदार कुकडेंचा घरचा आहेर

तसेच ते पुढे म्हणाले की, युद्धाचं स्वरूप गतीने बदलत आहे. ज्यामध्ये प्रिसिशन हल्ले, हाय-टेम्पो ऑपरेशन मल्टी डोमेन इंटीग्रेशन आणि सातत्याने आव्हानात्मक एअरस्पेस सामाविष्ट आहे. त्यांनी सांगितलं की, आर्मी एव्हिएशन सैन्याला तिसरा आणि अत्यंत प्रभावी आयाम देत आहे जो त्याला योग्य आणि निर्णायक शक्तींनी लेस बनवते या क्षमतामुळे आज एव्हिएशन फोर्स सैन्याचं एक प्रमुख कॉम्बॅट मल्टीप्लायर झाला आहे.

शेवगाव नगरपरिषदेमध्ये गणितं बदलली; एकनिष्ठांना डावलने राजळेंना भारी पडणार…

त्याचबरोर मानव संचलित आणि मानव रहित प्लॅटफॉर्मचा संयुक्त उपयोग सैन्याला रिकॉनाइसेंन्स सर्विलंन्स, लिफ्ट, हल्ले आणि प्रिसिशन एंगेजमेंट यासारख्या क्षणता प्रदान करत असल्याचं सेठ यांनी सांगितलं. अनेक टेक्निक्स जलद गतीने समाविष्ट झाल्याने आर्मी एव्हिएशन अधिक भक्कम होणार आहे. त्यांनी आरपीए म्हणजे रिमोटली पायसटेड एअरक्राफ्टच्या महत्त्वावर जोर दिला. ते म्हणाले की, सीएएटीस केंद्र बनवण्याचा निर्णय अत्यंत योग्य आहे.

‘या’ राशींसाठी काहीसा प्रतिकूल तुमच्या राशीचे काय? जाणून घ्या आजचं राशिभविष्य…

तर पास आऊट होणारे कॅडेट्सना संबोधित करताना जनरल सेठ म्हणाले की, प्रत्येक पावलामागे पुर्ण सतर्कता,नियमांचं पालन आणि मशीन्सप्रति सन्मान आवश्यक आहे. त्यांनी इशारा दिला की, कॉम्बॅट फ्लाईंगमध्ये चूक असू शकत नाही. रेड लाईन कधीही पार करू नका. परेडची सर्वात खास झलक यावेळी पाहायला मिळाली.

Exit mobile version