रुपयाच्या ऐतिहासिक घसरणीचा सर्व सामान्यांना भूर्दंड; स्वप्नपूर्तीसाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे

3 डिसेंबर रोजी रुपया प्रति डॉलर 90.54 च्या आतापर्यंतच्या विक्रमी नीचांक पोहोचला. रुपया घसरण्याची ही मागच्या ३ वर्षांतली तिसरी वेळ

Untitled Design (37)

Untitled Design (37)

 Weakening of rupee : जागतिक पातळीवर भारतीय रुपया घसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 3 डिसेंबर रोजी रुपया प्रति डॉलर 90.54 च्या आतापर्यंतच्या विक्रमी नीचांक पोहोचला. रुपया घसरण्याची ही मागच्या ३ वर्षांतली तिसरी वेळ आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण ही फक्त अर्थव्यवस्थेची (Economy) समस्या नाही. तर दैनंदिन वस्तू खरेदी करणाऱ्या, गॅजेट्सचा वापर करणाऱ्या, कर्ज देणाऱ्या किंवा मुलांच्या शिक्षणासाठी पैसे देणाऱ्या सामान्य माणसावर याचा थेट परिणाम पाहायला मिळतो. जागतिक स्तरावर भारत हा मोठ्या प्रमाणात कच्चे तेल, पेट्रोल (Petrol) आणि डिझेलची (Diesel) आयात करतो. जेव्हा डॉलर (Doller) मजबूत होतो, तेव्हा वस्तूंच्या किंमती वाढतात. याचा थेट परिणाम पेट्रोल पंपावर पाहायला मिळतो. इंधन महाग झाल्यास साहजिकच वाहतुकीचा खर्च वाढतो. या वाहतूक खर्च वाढीचा थेट परिणाम हा भाजीपाला, दूध, किराणा सामना, कपडे यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तूंवर देखील पाहायला मिळतो. म्हणजेच रुपयाच्या (Rupaya) घसरणीमुळे संपूर्ण बाजारपेठेतील चलनवाढीची साखळी सुरू होते.

रुपया घसरला! डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांकी पातळीवर; एका डॉलरची किंमत 90.02 रुपये

इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आणि गॅजेट्सच्या किंमतीवर देखील याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम पाहायला मिळतो. बहुतेक गोष्टी आपण कुठून आयात करतो, त्यावर त्याची किंमत अवलंबून असते. याठिकाणी डॉलरमध्ये पैसे दिले जातात. त्यामुळे रुपयाची घसरण कंपन्यांना वाढत्या खर्चामुळे उत्पादनाच्या किंमती वाढवण्यास भाग पाडते. याचा परिणाम प्रीमियम स्मार्टफोनपासून ते एलईडी बॉब आणि स्वयंपाकघरातील मूलभूत उपकरणांपर्यंत प्रत्येक गोष्टीवर जाणवतो. शेअर बाजारातील चढउतारांचा शेअर बाजारावरही संमिश्र परिणाम होतो. इंटरनॅशनल मार्केटमध्ये काम करणाऱ्या आयटी आणि फार्मासारख्या क्षेत्रांना याचा फायदा होत असतो. कारण त्यांची कामे डॉलरमध्ये असते. मात्र ऑटोमोबाइल्स, इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद आणि आयातीवर असलेयांना देखील याचा फटका बसत असतो. परिणामी समभागांच्या किंमती घसरतात आणि अस्तिरता वाढते.

परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर देखील याचा थेट परिणाम होत असतो. रुप्याच्या घसरणीमुळे त्यांचे इतर शुल्क, राहणीमान आणि इतर खर्च देखील वाढतात. महागाई केव्हा वाढते? तर ज्यावेळेस आरबीआय व्याजदरात करणे टाळते आणि कधीकधी व्याजदर वाढवावे लागतात. याचा अर्थ गृहकर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्ज हे सर्व महाग होतात आणि ईएमआय वाढतात. सामान्य माणसाच्या बचतीवर आणि गुंतवणुकीवर परिणाम, रुपयाच्या घसरणीमुळे महागाई येते आणि वाढती महागाई म्हणजे सामान्य माणसाच्या खिशातून अधिक पैसा बाहेर येईल. यामुळे बचत कमी होऊन गुंतवणुकीचे मूल्य कमी होते. हे विशेषतः कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी लागू होते.

जेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपया घसरतो, तेव्हा भारताला परदेशातून वस्तू खरेदी करण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतात. कारण बहुतेक आंतरराष्ट्रीय व्यवहार हे डॉलरमध्ये होत असतात. याचाच अर्थ असा होतो की रुपया जेवढा खाली पडेल तितकाच भारताला आयात केलेल्या वस्तूंसाठी अतिरिक्त खर्च द्यावा लागेल. याचा थेट परिणाम महागाई आणि खर्चावर होतो.

Exit mobile version