Download App

West Bengal : केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांवर हल्ला, भाजप आणि तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये तणाव

कूचबिहार : पश्चिम बंगालमधील (West Bengal) कूचबिहारमध्ये भाजप (BJP) कार्यकर्ते आणि तृणमूल (Trinamool Congress) कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यामध्ये केंद्रीय गृह, युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक (Nisith Pramanik) यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. या हल्ल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांवर करण्यात आला आहे.

दिनहाटा परिसरात कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी मंत्री निशीथ प्रामाणिक जात असताना ही घटना घडली. या हल्ल्यात निशीथ यांच्या कारच्या काचा फुटल्या. यानंतर सुरक्षा रक्षकांनी निशीथ यांना तेथून ताब्यात घेतले. त्यावर निशीथ म्हणाले की, बंगाल आता दुष्टांचे राज्य झाले आहे. ज्या प्रकारे हल्लेखोर हल्ले करत आहेत, ते सामान्य राजकीय वातावरण कधीच असू शकत नाही. बंगालच्या लोकांनो, बघा काय चालले आहे.

कसब्यात एका बूथवर 1 हजार बोगस मतदान, भाजप आमदार Madhuri Misal यांचा आरोप

प्रत्यक्षात येथे बीएसएफच्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. यामुळे स्थानिक नागरिक संतप्त झालेले होते. तरुणाच्या मृत्यूचा आरोप तृणमूल काँग्रेसने केंद्र सरकारवर केला होता. पक्षाचे स्थानिक आमदार आणि बंगाल सरकारमधील मंत्री उदयन गुहा यांनी तर निशीथ यांचा कार्यक्रम परिसरात झाला तर तृणमूल काँग्रेस आपल्या तेथील बूथ अध्यक्षांना काढून टाकेल, असे म्हटले होते.

तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी 11 फेब्रुवारी रोजी कूचबिहारमध्ये एका बैठकीला गेले होते. येथे बीएसएफच्या गोळीबारात एका तरुणाच्या मृत्यूवरून अभिषेकने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि निशीथ यांच्यावर निशाणा साधला. तरुणाच्या मृत्यूच्या निषेधार्थ तृणमूल काँग्रेसने केंद्रीय गृह राज्यमंत्री निशीथ यांच्या घराला घेराव घातला.

बंगालचे मंत्री आणि दिनहाटाचे आमदार उदयन गुहा यांनी निशीथ येथे आल्यास त्यांना काळे झेंडे दाखवले जातील, असे सांगितले होते. भाजपला या भागात सभा किंवा कार्यक्रम करू देऊ नका, तसे झाल्यास तृणमूल काँग्रेस बूथ अध्यक्षांना हटवेल, असे म्हटले होते.

Tags

follow us